आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीजी म्हणाले होते, नेताजी, माझ्यासोबत चला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ताश्कंदकरारासाठी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री रशियात गेले होते. रशियन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भेटण्याची परवानगी मिळवली. नेताजी राहत असलेल्या ठिकाणी शास्त्रीजी जातात. समोर दिसताच पाया पडतात.
नेताजी अधिकाऱ्याला विचारतात, हे कोण? अधिकारी उत्तर देतात, हे तुमच्या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. शास्त्रीजी पाकिस्तानसोबतचे युद्ध तसेच कराराची माहिती देतात. करारामुळे देश माझ्यावर नाराज झाला आहे. ते म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत चला. नेताजींनी स्मितहास्य केले. शास्त्रीजी म्हणाले, तुमच्या सुनेला (शास्त्रीजींच्या पत्नी) मी ही बातमी सांगणार आहे. तुम्ही माझ्यासोबत आलात तर अख्खा भारत देश मला डोक्यावर घेऊन नाचेल. दोघांची भेट संपली अन् त्याच रात्री शास्त्री यांचे निधन झाले. रशियन गुप्तहेर पेचोरीन याच्या हवाल्याच्या आधारावर ‘सुभाष एक खोज’ या राजेश मोहन भटनागर यांच्या पुस्तकात हा १२ पाणी उतारा आहे. शास्त्रीच परतले नाहीत. त्यामुळे नेताजी तेव्हा जिंवत होते अशी एक शक्यता आहे, असे मत प्रख्यात साहित्यिक, राजहंस प्रकाशनाचे संपादक, प्रख्यात संशोधक आनंद हर्डीकर यांनी औरंगाबादकरांसमोर मांडले.
‘दिव्य मराठी’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस तुम्ही कोठे आहात?’ या विषयावर त्यांच्या दोनदिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी त्याचे दुसरे समारोपाचे पुष्प त्यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी उद्योजक अनिल भालेराव होते.
मोदी सरकार बोस कुटुंबीयांना पुढे करतेय
आतापर्यंतच्या सरकारने नेताजींची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत; परंतु आता मोदी सरकार प्रयत्न करतेय. बोस कुटुंबीयांना पुढे करून अन्य देशांवर दबाव आणण्याचे सूचक काम त्यांनी चालवल्याचे हर्डीकर म्हणाले.
‘वंदेमातरम’च्या घोषणा
हर्डीकरहे व्याख्यानाला उभे राहताच उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’ ‘भारत माता की जय’ अशा स्वयंस्फूर्त घोषणा दिल्या. शेवटी हर्डीकर यांनी रसिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. एक प्रश्न विचारताना प्रसन्ना शास्त्री या महिलेला अक्षरश: रडू कोसळले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हर्डीकर यांनी कोणत्या शक्यता व्यक्त केल्या...
बातम्या आणखी आहेत...