आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reservation Is Made ​​regarding To Emulate Of Congress Sena

आरक्षणाबाबत काँग्रेसने बाळासाहेबांची री ओढली - शिवसेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-जातीपातीवर आधारित आरक्षण रद्द करून फक्त आर्थिक निकषावरच आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी केली आहे. मात्र, असे आरक्षण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. काँग्रेसने आजपर्यंत केवळ जातीपातीचेच राजकारण केले आहे, अशी टीका विरोधकांनी केली, तर अजून सामाजिक समता आलेली नाही. त्यामुळे जातीवर आधारित आरक्षण कायम ठेवले जावे, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी दिल्लीत द्विवेदी यांनी जातीपातीवरील आरक्षण पद्धत रद्द करून आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांनाच आरक्षण दिले जावे, असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले. काँग्रेसचे हे मत नसून त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही तर शिवसेनाप्रमुखांची संकल्पना
आर्थिक निकषावर आधारित आरक्षण ही बाळासाहेब ठाकरे यांचीच संकल्पना होती. काँग्रेसने नेहमीच जातीपातीचे राजकारण करून कायम वाद तेवत ठेवला आहे. आगामी निवडणुकीत पक्षाला काही तरी फायदा होईल, म्हणून काँग्रेसकडून हा डाव खेळला जात आहे. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
द्विवेदी योग्य बोलले
आरक्षण हे आर्थिक निकषावरच असावे, जातीपातीवर असता कामा नये. त्यामुळे द्विवेदी यांचे मत योग्य आहे. सर्व जाती-धर्मातील दुर्बलांना आरक्षण मिळाले तरच देशाचा विकास होऊ शकेल. शासनाच्या योजनांचाही योग्य लाभ मिळेल. केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस देशात सत्तेत आहे. या काळात त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा निर्णय का घेतला नाही. निवडणुकीच्या तोंडावर का सुचले. जाती-पातीत भांडणे लावून काँग्रेसनेच देशाचे वाटोळे केले, हे सर्वज्ञात आहे. आता नवा पत्ता फेकून निवडणूक जिंकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. संजय जोशी, उपमहापौर.
जाती आधरित आरक्षणच हवे
सर्व जातींना समान सामाजिक दर्जा मिळत नाही, तोवर जाती आधारितच आरक्षण हवे. देशात अजून सामाजिक समता आलेली नाही. प्रतिष्ठाही समान मिळालेली नाही. त्यामुळे जातीवर आधारित आरक्षण असायलाच हवे. चंद्रभान पारखे, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते.
हीच योग्य वेळ
जातीपातीवर आधारित आरक्षणामुळे समाजात तेढ निर्माण होते. द्विवेदींची सूचना रास्त आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. ही सूचना निवडणुकीच्या आधी असली तरी हीच योग्य वेळ आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसला वाद घालण्याची गरज नाही. डॉ. जफर खान, माजी विरोधी पक्षनेते.
मतमतांतरे