आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reservation Percentage In Aurangabad Corporation

AMC : मनपात दलितांचा टक्का पहिल्यांदाच वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच २७ दलित नगरसेवक प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यापैकी २२ जण अनुसूचित जातींसाठी, तर जण अनुसूचित जमाती राखीव वॉर्डातून विजयी झाले आहेत. शिवाय यंदा पहिल्यांदाच सर्वसाधारण वॉर्डातून दलित नगरसेवकांनीही बाजी मारली आहे.
जातीयवादी पक्ष म्हणून कायम टीकेचे धनी ठरणाऱ्या शिवसेनेने सर्वाधिक दलित नगरसेवकांना निवडून आणले. त्यानंतर एमआयएम आणि भाजपने प्रत्येकी पाच, तर चार अपक्ष निवडून आले आहेत.
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन दशकांनंतर ११३ पैकी २७ नगरसेवक नागरी समस्या सोडवण्यासाठी आवाज ‘बुलंद’ करणार आहेत. शिवसेना जातीयवादी संघटना असून मागासवर्गीयांचा द्वेष करणारी असल्याची कायम टीका झाली. वस्तुत: नगरसेवक दलितांचे निवडून आणून शिवसेनेने आपल्यावरील आरोप पुसून टाकला आहे. महायुतीत रिपाइंला चार जागा दिल्या. अर्थात, रिपाइंचा पराभव झाला तरी सेनेने ही कमी स्वत:च भरून काढली आहे.
पुरुष तर महिलांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. भाजपने पाचपैकी तीन महिलांना विजयी केले आहे. धर्मांध म्हणून संभावना होणाऱ्या एमआयएमनेही दलितांना विजयी केले आहे. त्यापैकी तीन महिला, तर दोन पुरुष असून वॉर्डांतून अपक्षांनी बाजी मारली आहे.

३१ टक्क्यांना मिळाले प्रतिनिधित्व

अनुसूचित जातींना आरक्षित असलेल्या वॉर्डातून २२ जण, जमातीची एकमेव महिला नगरसेविका आणि सर्वसाधारण वॉर्डातून विजयी झालेल्यांची ही टक्केवारी ३१ टक्क्यांच्या घरात आहे. रिपाइंचे (डी) कैलास गायकवाड यांनी भारतनगरमधून सर्वसाधारण प्रवर्गाचे दिग्विजय शेरखाने यांचा पराभव केला आहे.
एमआयएमच्या लता मगन निकाळजे यांनीही सर्वसाधारण वॉर्डातून बाजी मारली आहे. एकतानगरातून रूपचंद वाघमारे यांनीही ‘ओपन’ वॉर्डातूनच सर्वांना धूळ चारली आहे. शिवाय अनुसूचित जमातीच्या ज्योती अभंग यांनी चेतनानगरातून सहा पुरुषांना पराभूत केले आहे.