आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनस मिळाल्यानंतर रविवारी बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वात मोठा सण दिवाळीची घरोघरी तयारी सुरू आहे. अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणानिमित्त शहरातील बाजारपेठ नटली आहे. वसुबारसेपासून (शनिवार नोव्हेंबर) दीपोत्सवाला सुरुवात होत असल्याने शहरवासीयांनी रविवारची सुटी खरेदीत घालवली आणि बाजारपेठेतील सर्व रस्ते ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेले. जत्रेत गर्दी व्हावी तशी आज रविवारी बाजारात गर्दी दिसून आली. कारण दिवाळीपूर्वी खरेदीसाठी आजचा पहिलाच रविवार असल्याने ही तोबा गर्दी झाली होती.

औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस देऊन मालामाल केले आहे. त्याचबरोबर अनेक शासकीय आणि निमशासकीय संस्थांनी कर्मचाऱ्यांना अग्रिम देऊ केला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांसह सरकारी अधिकारी आणि बाबूंनीही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. बाजारपेठेत प्रामुख्याने कपडे खरेदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर नागरिकांचा भर दिसून येत आहे. शहरातील वस्त्रांच्या दालनात पाय ठेवायलाही जागा नव्हती. कपडे खरेदीमुळे आज सुमारे कोटींच्या वर उलाढाल झाली असल्याचा अंदाज कपडे व्यापारी हरविंदरसिंह सलुजा यांनी वर्तवला. इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही ७० लाखांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यापारी पंकज अग्रवाल यांनी व्यक्त केला. याशिवाय दिवाळीच्या फराळासाठी किराणा, गृहसजावटीची दुकाने, फर्निचर शॉप यामध्ये कोटींपर्यंतची उलाढाल झाली आहे.

खरेदीचा रविवार
खरेदीसाठीआजचा पहिलाच रविवार होता. पुढील रविवारपूर्वीच दिवाळीतील सणवार सुरू होत आहेत. वसुबारसेने (शनिवार) दिवाळी सुरू होणार असल्याने अनेकांनी आजच्या रविवारीच खरेदीला प्राधान्य दिले.

१० कोटींवर उलाढाल
साड्यांचेविविध प्रकार यंदा बाजारात आहेत. जरीकाठापासून डिझायनर साडीपर्यंतच्या साड्यांची रेलचेल दिसून आली. अनारकली, प्लाझो आणि डेनिम या वस्त्र प्रकारांवर तरुणींच्या उड्या पडल्या. एकूण बाजारपेठेची आजची उलाढाल १० कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

खरेदीचा आनंद!
सध्याऑनलाइन मार्केटिंगमुळे बाजारात प्रत्यक्ष जाऊन खरेदी करण्याची संख्या थोडी कमी झाली असली तरीही बाजारपेठेत ग्राहकांचा बहर आला होता. कारण बाजारात प्रत्यक्ष जाऊन कपडे हाताळल्यानंतर खरेदी करण्याचा आनंदही औरच आहे. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आदी वस्तूंचीही आज मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली.
दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत तोबा गर्दी उसळली होती. प्रमुख बाजारपेठ असलेला टिळकपथ असा गर्दीने फुलून गेला. छाया : अरुण तळेकर