आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजन असणाराच सर्वात श्रीमंत; सयाजी शिंदे यांचा 25 हजार झाडे लावण्याचा संकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- पावसाच्या सुरुवातीला ५० एकर गायरान जमिनीवर विविध जातींची २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून ही झाडे ग्रामस्थांनीच जगवायची आहेत. हीच झाडे येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन देणार आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात अन ज्याच्याकडे ऑक्सिजन तो सर्वात श्रीमंत त्यामुळे वाघलगाव एकबुर्जीमध्ये झाडे लावून गाव श्रीमंत करू असे प्रतिपादन मराठी चित्रपट सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. 

सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सिनेलेखक अरविंद जगताप, रवींद्र बनसोड यांच्या इर्जीक फाउंडेशनच्या वतीने गंगापूर तालुक्यातील एकबुर्जी वाघलगाव येथील पन्नास एकर शासकीय गायरान जमिनीवर सुमारे २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून त्या निमित्ताने सोमवारी सयाजी शिंदे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर,गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, अरविंद जगताप आदींनी प्राथमिक स्वरूपात आज जागेची पाहणी केली. 

या वेळी प्रशांत बनसोड,राजेश सरकटे, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, रघुनाथ ढोले, जल क्रांती ग्रुपचे प्रशांत अवसरमल, महेश गुजर, गणेश सोनवणे,अरुण शेजूळ,संतोष दांडगे आदींची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र बनसोड यांनी केले आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गावाची सविस्तर माहिती देऊन सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या जीवनातील चढउतार जिद्दीने इथपर्यंत पोहाेचण्याचे व्यक्तिमत्त्व सयाजी शिंदे यांनी मिळविले आहे. असे सांगून झाडे लावण्याचे महत्त्वदेखील त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. 
 
या वेळी राजेश सरकटे नेहमीच्या आपल्या शैलीतबोलताना म्हणाले, ‘किसीने रोजा रखा किसीने उपवास रखा लेकीन उनकाही कबुल होगा जिसने अपने माॅ बाप को अपने पास रखा’ असे बोल ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीही आपल्या मार्गदर्शनात आज वृक्ष लागवड करण्याची काळाची गरज असल्याने या उपक्रमाकडे सिनेअभिनेते सेलिब्रेटी वळाले आहेत. झाडे लावण्यास सर्वच कंटाळा करतात पण वाघलगाववासीयांचा उत्साह पाहता. आम्ही हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा भापकर यांनी केली. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी चावडी वाचन उपक्रम माध्यमातून शेतकऱ्यांना सातबारा वाटप केले. सुत्र संचलन आरती बनसोड यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...