आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात पुन्हा सुरू व्हावी धर्मचिकित्सेची परंपरा - डाॅ. हमीद दाभोलकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्राला संस्कृती, धर्म, वैचारिकतेची परंपरा आहे. परंतु प्रबोधनकार, संत गाडगे महाराजांनंतर धर्मचिकित्सेची परंपरा खंडित झाली असून ती पुढे नेण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती २५ वर्षांपासून करते आहे. मात्र, आजची परिस्थिती पाहता प्रश्न विचारणारी मनेच राहिलेली नाहीत. अशी मने निर्माण करायची करण्यासाठी धर्माची चिकित्सा झाली पाहिजे, असे प्रतिपादन डाॅ. हमीद दाभोलकर यांनी केले.

रविवारी स.भु.संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बापू-सुधाताई काळदाते प्रतिष्ठान औरंगाबादच्या वतीने रविवारी संविधान परिचय अभ्यासक्रमात एम.पी.लॉ. कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ.भाग्यश्री गोडबोले यांचे "भारतीय न्यायव्यवस्था-वैशिष्ट्ये आणि संविधान संरक्षक म्हणून भूमिका' आणि दुपारच्या सत्रात हमीद दाभोलकर यांचे "अंधश्रद्धा निर्मूलन विवेकवाद आणि राज्यघटना' याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी दाभोलकर म्हणाले, जिथे विज्ञानाचा दुरुपयोग करून शोषण केले जाते. अशांविरुद्ध काम करणे हा या अंधश्रद्धा निर्मूलनाचा मुख्य उद्देश अाहे. जादूटोणाविरोधी कायद्याची काय गरज, असेही बोलले जात होते. मात्र हा कायदा किती आवश्यक आहे. हे या कायद्यानंतर अडीचशेहून अधिक भोंदूबाबांना पकडल्यानंतर समोर आले. भारतीय राज्यघटना चांगली असली तरी त्यातील नियम प्रभावीपणे राबवले जात नाही. याचे कारण राज्यघटनेचे दोन शत्रू धर्मसत्ता आणि राज्यसत्ता हे आहेत. जे हितसंबंध दुखावणारे आहेत. तर तिसरा शत्रू हा राज्यघटनेच्या चौकटीतच राहून काम करतो. मात्र तिचा भावार्थ पार पाडत नाही.

गेल्या ६५ वर्षांत घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली झाली. सध्या एका ठरावीक धर्माचे राज्य प्रस्थापित करण्याचे काम होत आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने जे योगदान दिले. तो पक्षही आज दुरावला आहे. डावे पक्ष प्रभावहीन झालेत. इतर लोकही स्वार्थापलीकडे पाहत नाही. त्यामुळे कोंडी निर्माण झाली. दाभोलकर, पानसरेंचे मारेकरीदेखील याच कोंडीतून निर्माण झालेत. तेव्हा या सर्व प्रकारांची चिकित्सा होणे आवश्यक असल्याचेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

घटनेमुळे मिळाले अधिकार : डॉ. गोडबोले
सकाळीझालेल्या सत्रात डॉ.भाग्यश्री गोडबोले यांचे "भारतीय न्यायव्यवस्था-वैशिष्ट्ये आणि संविधान संरक्षक म्हणून भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,भारतीय राज्यघटनेमुळे मूलभूत नागरिक म्हणून अधिकार मिळाले. त्या अधिकारांचा व्यापक स्वरूपात अर्थ लावून उपयोग करूनच न्याय दिला जातो. ज्या गोष्टीत सरकार कमी पडते तिथे न्यायालयाने काम केले आहे.
बातम्या आणखी आहेत...