आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Restriction On Municipal Officers Not Speak Media

मनपा अधिकाऱ्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास मज्जाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेबाबत माध्यमांत येणाऱ्या बातम्या मनपातील अधिकारीच पुरवत असल्याचा संशय व्यक्त करत या पुढे फक्त महापौर अायुक्त हेच माध्यमांना माहिती देतील. अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देऊ नये, असा आदेश प्रशासनाने दिला आहे. महापालिकेकडून होत असलेली कार्यवाही मनपाच्या कारभाराविषयी माध्यमांत सातत्याने बातम्या येत असतात. या बातम्या अधिकारीच देत असल्याचा संशय प्रशासनाला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या कलम नुसार अनधिकृत माहिती पुरवण्यास वृत्तपत्रे तसेच आकाशवाणीशी संपर्क ठेवण्यास प्रतिबंध असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.