आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Results Due To Adjustments Growth In Students Fail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकालातील फेरबदलामुळे नापास विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जून-२०१५ मध्ये परीक्षा झाल्या, २० ऑगस्ट रोजी निकालही जाहीर केले. बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या हाती उत्तीर्ण अथवा एटीकेटीचे गुणपत्रकही दिले. मात्र, एटीकेटीचा पॅटर्न बदलल्यामुळे आधी जाहीर केलेला निकाल मागे घेऊन विद्यापीठाने सप्टेंबर रोजी पुन्हा निकाल जाहीर केला.
औषधनिर्माणशास्त्राच्या पदवीच्या (बी. फार्मसी) विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून पुढच्या वर्गात प्रवेश मिळावा, अशी मागणी त्यांनी विद्यापीठाकडे केली आहे. मात्र, तांत्रिक चूक झाल्याचे मान्य करत जाहीर निकाल मागे घेताच येणार नसल्याचे स्पष्टीकरण प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी दिले आहे. बी. फार्मसीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र २०१४-२०१५ दरम्यान चार विषयांसाठी एटीकेटीचा नियम (५० टक्के एटीकेटी) होता. त्यांचा द्वितीय वर्षाचा निकाल अभियांत्रिकीच्या (२५ टक्के एटीकेटी) धर्तीवर जाहीर करण्यात येतो. मात्र, प्रॅक्टिकल किंवा थेअरीच्या चार विषयांत अनुत्तीर्ण असले तरीही त्यांना द्वितीय वर्षात प्रवेश देण्यात आला. द्वितीयमधून तृतीय वर्षात जाण्यापूर्वी त्यांना अभियांत्रिकीचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रॅक्टिकलचे दोन आणि थेअरीच्या दोन विषयांत अनुत्तीर्ण असल्यास त्यांना एटीकेटी दिली जाण्याचा नियम आहे. प्रॅक्टिकलमध्ये शक्यतो सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतात. थेअरीच्या फक्त दोन विषयांसाठी एटीकेटी दिली जाण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा निकाल अनुत्तीर्ण असा आला आहे. त्यामुळे अशा २० ते २२ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (११ सप्टेंबर) दुपारी विद्यापीठ गाठले. त्यांनी भाविसेचे तुकाराम सराफ यांच्यामार्फत कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांना निवेदन देऊन चारही थेअरीच्या विषयांसाठी एटीकेटी लागू करण्याची मागणी केली. आधी जाहीर झालेला निकालात परीक्षा विभागातील कर्मचाऱ्याकडून चूक झाली, ती वेळीच दुरुस्त करून पुन्हा नव्याने निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

५० टक्क्यांऐवजी आता २५ टक्केच एटीकेटी
नव्या नियमानुसार चार नव्हे दोनच विषयांसाठी सूट
पूर्ववत निकाल देण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

फक्त २२ विद्यार्थ्यांचा प्रश्न
लाखोविद्यार्थ्यांचा निकाल घोषित करताना बारीकसारीक चुका होतातच. फार्मसीच्या एटीकेटीसाठी पॅटर्न आधीच बदलला आहे. निकाल जाहीर करताना डाटा एंट्री ऑपरेटरने जुन्या पॅटर्ननुसार निकाल जाहीर केला. मात्र, चूक लक्षात आल्यामुळे नव्याने निकाल देण्यात आले आहेत. हा प्रश्न फक्त २२ विद्यार्थ्यांचा असून त्यांच्या निकालात आता काहीच बदल होणार नाही. दोन प्रॅक्टिकल आणि दोन थेअरीच्या विषयांसाठी एटीकेटी लागू आहे. विद्यार्थ्यांच्या अपेक्षेनुसार चारही थेअरीच्या विषयांना एटीकेटी देता येणार नाही. डॉ.प्रल्हाद लुलेकर, परीक्षा नियंत्रक

विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश द्यावा
ज्याप्रमाणेप्रथम वर्षातून द्वितीय वर्षात प्रवेश देण्यात आला, त्यानुसार या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश देण्यात यावेत. ३२० विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात यावा. शिवाय पुनर्मूल्यांकनासाठी कालावधी देण्यात यावा. तुकारामसराफ, विद्यापीठप्रमुख, भाविसे