आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंत: सीबीएसईचा निकाल शंभर टक्के, नाथ व्हॅलीने निकालाची परंपरा राखली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. शहरातील अडीचशे ते तीनशे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी निकालाच्या यशाची परंपरा कायम राखली. जैन इंटरनॅशनल स्कूलच्या वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला, तर रिव्हरडेलचे ७६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. केंद्रीय विद्यालयाचा निशांत कदम शाळेतून प्रथम आला, नाथ व्हॅलीचा मोहित कासलीवाल विज्ञान शाखेत, तर अक्षत बाकलीवाल वाणिज्य शाखेत प्रथम आला.
जिसाचा निकाल १०० %
जैनइंटरनॅशनल स्कूलच्या वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जिसाच्या दोन्ही शाखांतून यश कमलेश जैन हा ९६ टक्के गुण घेऊन प्रथम आला. द्वितीय स्थानावरील समीक्षा संजय शर्मा हिने यश मिळवले असून तिला ९२.६ टक्के गुण मिळाले. यश आणि समीक्षा हे दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेतून प्राजक्ता नारायण पाटील ही ८८ टक्के गुण मिळवून प्रथम आली.
स्टेपिंगस्टोनचे २४ उत्कृष्ट
स्टेपिंगस्टोनच्या २४ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले. शाळेतून ७९ विद्यार्थी बसले होते.
नाथव्हॅलीचे मोहित, अक्षत
नाथव्हॅली स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेतून अक्षत बाकलीवाल ९७ टक्के गुण घेऊन प्रथम आला, तर दर्शन गट्टाणी आणि रजत माली ९५. गुण घेऊन द्वितीय आले आहेत. विज्ञान शाखेतून मोहित कासलीवाल ९६.४० टक्के गुण घेऊन प्रथम, मेहुल मोहगावकर ९६.२० टक्के गुण घेऊन द्वितीय आणि वरद कोहली हा ९६ टक्के गुण घेऊन तृतीय आला. इंग्रजी विषयात मेहुलने सर्वाधिक ९८ गुण मिळवले, तर अर्थशास्त्र विषयात अक्षत ९९ आणि मानसशास्त्र विषयात वरदने ९७ सर्वाधिक गुण मिळवले आहेत. एकूण ६२ विद्यार्थी बसले होते.
रिव्हरडेलचे ७६ विद्यार्थी
रिव्हरडेलहायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून राधिका शेलार या विद्यार्थिनीने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला. कीर्ती दास आणि अभिनंदन गुप्ता ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर श्रुती कल्याणकर ही ९१ टक्के गुणांसह तिसरी आली. शाळेचे ७६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. अन्य सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
निशांत कदम शाळेतून प्रथम
केंद्रीयविद्यालयाचा निशांत कदम ९१.४ टक्के गुण मिळवून प्रथम आला. शाळेतून एकूण ५० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात १७ विद्यार्थिनी आणि २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १३ विद्यार्थी वाणिज्य शाखेचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...