औरंगाबाद - निवृत्त प्राध्यापकांच्या ग्रॅच्युईटीची 39 कोटींची थकित रक्कम उच्चशिक्षण विभागाने सोमवारी औरंगाबाद खंडपीठात जमा केली. सर्वाेच्च न्यायालयाने 32 कोटी जमा करण्याचे आदेश दिले होते, मात्र विभागाने 39 कोटींचा धनाकर्ष जमा केला. या रकमेतून निवृत्त शिक्षकांना ग्रॅच्युईटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. असोशिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटीज सुपरअॅन्युएटेड टिचर्सची ग्रॅच्युईटीच्या रकमेची मागणी उच्चशिक्षण विभागाने फेटाळली. त्यामुळे 129 शिक्षकांतर्फे खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.
पुढे सर्वोच्च न्यायालयाने एकाच वेतन आयोगातील निवृत्तांच्या ग्रॅच्युइटीत भेदभाव करता येणार नाही, असा निकाल 1982 मध्ये दिला. सहाव्या वेतन आयोगात ऑगस्ट 2009 पूर्वीच्या निवृत्तांना 5 लाख तर सप्टेंबर 2009 नंतरच्यांना 7 लाख रुपये ग्रॅच्युईटी देण्याचे शासनाचे आदेश होते.