आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना म्हणाले, मोनिका माय डार्लिंग! खळखळून हसवणारा सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सपत्निक भारत दौऱ्यावर आले. मोदींनी स्वागत करताच ते म्हणाले, मोनिका माय डार्लिंग. मग पद्मासनात बसले अन् मोदी त्यांना पुष्पगुच्छ देत म्हणाले, तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा.....अशा इरसाल शब्दांनी खळखळून हसवणारा सोहळा घाटीतील निवृत्त कर्मचाऱ्यांनी रविवारी अनुभवला. वास्तवात घडलेला नव्हे तर रेडिओवर चॅनेल बदलांताना कानी पडणाऱ्या अर्धवट वाक्यांमुळे उडालेला गोंधळ प्रहसनातून सादर करत महिला कर्मचाऱ्यांनी धमाल उडवून दिली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा तिसरा मेळाळा पन्नालालनगरातील यशोमंगल कार्यालयात झाला. रेडिओनाट्याने आणली रंगत : प्रभाहस्तक, संध्या पंडित, शुभांगी जोशी, सुधा आफळे आणि सुलभा खंदारे यांच्या नाट्यवाचनाने कार्यक्रमात रंगत आणली. रेडिओ चॅनेल बदलताना निर्माण झालेला विनोद सांगून त्यांनी टाळ्या वसूल केल्या. संध्या पंडित यांनी प्राणिक हीलिंगबाबत तर ‘साठीनंतरचे आयुष्य’ या विषयावर डॉ. जयंत बरिदे यांनी मार्गदर्शन केले. 

शहरातील १७४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा सोहळा सुरू केला आहे. यातील जण वर्षभरात निवर्तले. या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्यांचा सत्कार झाला. यानंतर श्री बाबासाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ४६ विद्यार्थ्यांना रुचकर भोजन देण्यात आले. शिवाय संस्थेला ८५५० रुपयांची मदतही देण्यात आली. यशस्वितेसाठी आर. बी. कळसे, सुभाष जाधव, अनिल जोशी, शुभांगी जोशी, सुरेश देशपांडे, एल. डी. थोरात यांनी परिश्रम घेतले. 

चैतन्याचा सोहळा 
स्वत:सहनातवंडांचेवाढदिवस एड्सग्रस्त मुलांसह साजरा करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. जीवनाच्या संध्याकाळी इतरांच्या आयुष्यात आनंदाची ज्योत लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. -अनिल जोशी, सेवानिवृत्त कर्मचारी 
बातम्या आणखी आहेत...