आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज पाच वर्षांत फेडा, निम्मे व्याज सरकार भरणार- खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अवकाळी पाऊस, दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट असल्याने २०१४-१५मधील पीक कर्जाची फेररचना करण्यात येणार आहे. त्यानुसार यंदाच्या कर्जाच्या फेडीसाठी शेतकऱ्यांना पाच वर्षांचे हप्ते पाडून दिले जातील. मुदत वाढल्याने सध्या टक्के असलेला कर्जाचा व्याजदर बँकेच्या नियमाप्रमाणे १२ टक्के लागेल. तो टक्केच ठेवण्यासाठी नाबार्डची परवानगी घ्यावी लागेल. ती मिळाली नाही तर वरचे टक्के व्याज राज्य सरकार भरील. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी ही माहिती दिली.

खरिपपूर्व आढावा बैठकीत खडसे म्हणाले, यापूर्वी दुष्काळी भागात पीक कर्जाची तीन राज्यात खरीप रब्बीतील पिके गेल्यामुळे पीक कर्ज भरणे अवघड बनले. मात्र फेररचना केल्याने शेतकऱ्यांना यंदा पीक कर्ज मिळणे सोपे जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...