आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rickshaw And Tow Wheeler Accident Tow Dead Inpachora

रिक्षा-दुचाकीत अपघात; दोन ठार, नऊ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - लाेडिंग रिक्षा व दुचाकीत झालेल्या अपघातात दोन जागीच ठार, तर ९ जण जखमी झाल्याची घटना पैठण-पाचोड रस्त्यावर असलेल्या लिंबगाव फाट्याजवळ मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. बाबू खंडू दिवटे (६६, रा. कानडगाव, ता. अंबड) व युवराज बाबू पवार (१८) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे.

अंबड तालुक्यातील कानडगावहून बाबू दिवटे व युवराज पवार हे दुचाकी (एमएच २१ एएस ५६)ने मुंगी येथे गेले होते. ते नातेवाइकांना भेटून परतत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास पाचोड-पैठण रस्त्यावर असलेल्या लिंबगाव फाट्याजवळ लोडिंग रिक्षा (एमएच २१ एक्स ५५३७) मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वार बाबू खंडू दिवटे व युवराज बाबू पवार हे दोघे जागीच मृत्युमुखी पडले, तर लोंडिंग रिक्षामधील बदनापूर तालुक्यातील सायगाव येथील गणेश शेषराव देशपांडे (३०), शांताबाई गणेश देशपांडे (२६), सुभाष दिगंबर देशपांडे (४०), दयानंद सुधाकर गायकवाड (३५), आशाबाई सुभाष नाईक (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरील आरती हनुमान दिवटे (२) व अन्य पाचवर्षीय मुले गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना तत्काळ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या वेळी डॉ. शिवाजी पवार, डॉ. राहुल दवणे, डॉ. के. एन. स्वामी, डॉ. शेेख मसरत यांनी प्रथमोपचार केला. त्यानंतर पुढील उपचारार्थ औरंगाबादला हलवण्यात आले. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव मठ्ठे, संपत पवार, बीट जमादार महादेव निकाळजे हे करत आहेत.