आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांविरोधात रिक्षा बंद, शहर बस फुल्ल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - बंददरम्यान रिक्षाचालकांनी वसंतराव नाईक चौकात घोषणाबाजी केली.)

औरंगाबाद - पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात बुधवारी विविध रिक्षाचालक संघटनांनी बंद पाळून पोलिस आयुक्तालयावर निदर्शने केली. दिवसभर रिक्षा बंद असल्याने महाविद्यालयीन तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. काही रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली होती. त्यामुळे बंदमध्ये सहभागी रिक्षाचालकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत रिक्षाचे नुकसान केले. रिक्षा बंद असल्याने शहर बसमध्ये प्रवाशांनी गर्दी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून रिकाम्या धावत असलेल्या बस आज हाऊसफुल्ल झाल्या.

अवैध वाहतुकीवर कारवाईचा अहवाल 30 जून रोजी सादर करा, असे उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात आदेश दिले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी रिक्षांविरुद्ध आघाडी उघडली. त्याचा विरोध नोंदविण्यासाठी सहा रिक्षा संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. त्यात पँथर्स रिपब्लिकन रिक्षाचालक संघटना आक्रमक रूपात सहभागी झाली होती. त्यामुळे बंद यशस्वी झाला.

सकाळपासून ठिकठिकाणी थांब्यावर प्रवासी थांबले होते. रिक्षा मिळत नसल्याने त्यांची तारांबळ उडाली. अ‍ॅपेरिक्षाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार्‍या जालना रोडवर बुधवारी तुरळक वाहने दिसत होती. सिडको चौकात 500 रिक्षाचालक एकत्र येऊन प्रवासी घेऊन जाणार्‍या इतर रिक्षाचालकांना रोखत होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. गैरसोय टळावी म्हणून 65 शहर बस सोडण्यात आल्या होत्या. सकाळी सहा वाजेपासून शहरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. दुपारी संघटनांच्या वतीने पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांना निवेदन देऊन कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली. शहरात 11 हजार परवानाधारक रिक्षा आहेत. मात्र प्रत्यक्षात 25 हजारांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गंगाधर गाडे तसेच रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीच्या वतीने निसार अहमद खान यांनी निवेदन दिले.
जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा
शहर बस विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजेपासून 65 बस सोडल्या होत्या. त्या 15 मार्गावर धावल्या. सर्वच बस प्रवाशांनी फुल्ल झाल्या होत्या. जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. शहरातील सिडको बसस्थानक चौक, हर्सूल टी पॉइंट, सेव्हन हिल्स, गजानन महाराज मंदिर चौक, टीव्ही सेंटर आदी भागांना रिक्षांचा विळखा असतो. परंतु बंदमुळे येथील परिसर मोकळा दिसला. या भागांमध्ये वाहनांची वर्दळही दररोजपेक्षा कमी दिसली. शिवाय रिक्षांनी शाळेत जाणार्‍या मुलांना दांडी मारावी लागली.
जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा
शहर बस विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजेपासून 65 बस सोडल्या होत्या. त्या 15 मार्गावर धावल्या. सर्वच बस प्रवाशांनी फुल्ल झाल्या होत्या. जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. शहरातील सिडको बसस्थानक चौक, हर्सूल टी पॉइंट, सेव्हन हिल्स, गजानन महाराज मंदिर चौक, टीव्ही सेंटर आदी भागांना रिक्षांचा विळखा असतो. परंतु बंदमुळे येथील परिसर मोकळा दिसला. या भागांमध्ये वाहनांची वर्दळही दररोजपेक्षा कमी दिसली. शिवाय रिक्षांनी शाळेत जाणार्‍या मुलांना दांडी मारावी लागली.
अवैध रिक्षासाठी हजार पोलिस नियम डावलून
चालणार्‍या रिक्षांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. स्क्रॅप आणि विनापरवाना प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षांविरुद्ध कारवाईचे संकेत पोलिस आयुक्तांनी दिले असून गुरुवारपासून विनापरवाना, बॅज, गणवेश न घालणार्‍यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.
या भागात झाली अडचण
शहर बसची वाहतूक प्रवाशांच्या सोयीनुसार होत नसल्याने शहरातील अनेक जणांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. त्यांची आज खूप तारांबळ उडाली. विविध भागात रिक्षाने प्रवास करणारे शालेय विद्यार्थी, कामगार, नोकरदार यांच्यासह सर्वांचेच हाल झाले. क्रांती चौक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, टीव्ही सेंटर, जालना रोडवरील एपीआय कॉर्नर, बजरंग चौक, गारखेडा, गजानन महाराज चौक, सेव्हन हिल्स उड्डाणपुल, सिडको बसस्थानक, चिकलठाणा, हर्सूल टी पॉइंट, मिलकॉर्नर, बाबा पेट्रोल पंप चौक, बीड बायपास आदी ठिकाणी अनेक जण पर्यायी वाहनांच्या शोधात होते.
पुढील स्लाईडमध्ये वाचा...
पोलिसांमुळेच रिक्षावाले बिघडले....