औरंगाबाद - नेहमी पर्यटकांची रेलचेल असलेल्या पाणचक्कीच्या हौदात मोबाइलवर बोलताना तोल जाऊन पडल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत तो घाटीच्या शवागारात ठेवला आहे. शेख रऊफ शेख असद अली (30) असे मृताचे नावे आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास रिक्षाचालक शेख रऊफ पाणचक्कीच्या हौदाच्या बाजूला मोबाइलवर बोलत थांबला होता. बोलता बोलता त्याचा तोल जाऊन तो हौदात पडला. त्याला वाचवण्यासाठी चार-पाच जणांनी हौदात उडी घेतली. पण खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. पाणचक्की येथील कर्मचार्यांनी छावणी पोलिसांना तत्काळ माहिती कळवली. यानंतर सहायक फौजदार सी.बी. शेख यांनी कर्मचार्यांसह धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार शेख रब्बानी हे करत आहेत.