आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष समितीतर्फे मोर्चा, आज 20 हजार रिक्षा बंद पोलिस, आरटीओंच्या त्रासाविरुद्ध आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रादेशिक परिवहन आणि पोलिस प्रशासनाकडून होणा-या त्रासाच्या विरोधात रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीच्या वतीने सोमवारी एक दिवस शहरातील 20 हजार रिक्षा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या बंद आंदोलनामुळे आज 20 हजार रिक्षा धावणार नाहीत. अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष एस. के. खलील यांनी दिली.

आंदोलनात सहभागी होणाऱ्या संघटना : महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, भारतीय रिक्षाचालक संघ, राजीव गांधी ऑटोरिक्षा युनियन, बहुजन हिताय रिक्षाचालक मालक संघटना, रोशन ऑटोरिक्षा युनियन, अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी रिक्षाचालक मालक संघटना, ऑल मराठवाडा रिक्षाचालक संघ, औरंगाबाद ऑटोरिक्षाचालक मालक युनियन, न्यू जनता ऑटोरिक्षा युनियन, पँथर पॉवर ऑटोरिक्षा युनियनचा आंदोलनात समावेश आहे.
असा होणार परिणाम : शहराची लोकसंख्या अंदाजे 15 लाख आहे. औद्योगिक वसाहत, शाळा, महाविद्यालये, मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय, बसस्थानक आदी ठिकाणच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. शहर बसची संख्या 40 आहे. बहुतांश ठिकाणी बसची व्यवस्थाच नाही.

प्रमुख मागण्या अशा
1) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने लागू केलेली दंडाची शिक्षा रद्द करावी, या संहितेमुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास प्रतिदिन १०० रुपये, १० दिवस उशीर झाल्यास 1 हजार व 10 दिवसांपेक्षा अधिक उशीर झाल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येतो.

2) हकीम समितीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी.
3) पोलिस अधिकारी 207 कलमाचा दुरुपयोग करतात. जीएन बुक पावतीची चौकशी करावी
4) रिक्षांच्या परवान्यांवर चालकाचा फोटो व नंबर बंधनकारक करा.
5) अ‍ॅपे, पियाजो, बजाज महिंद्रा रिक्षांना तीनआसनी परवाना देऊ नये.
6) ओएलए टॅक्सी वाहतूक त्वरित बंद करावी.