आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवारांच्या विमानात सापडला काडतूसधारी प्रवासी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर प्रदेशातील शेतक-याच्या बॅगेत आठ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी काडतुसे जप्त करून शेतक-यास अटक केली. याच विमानाने उपमुख्यमंत्री अजित पवार रवाना होणार होते. त्यामुळे अगोदरच तेथे पोलिसांचा फौजफाटा होता.


सुंदर बेदनसिंग यादव (42, रा. बेहेलालपूर) याच्यासह 5 जण गुरुवारी सकाळी औरंगाबादहून खासगी वाहनाने शिर्डीला गेले. शुक्रवारी दर्शन घेऊन स्पाइस जेटने दिल्लीला परतताना यादवसह पाच जणांच्या बॅग तपासल्या गेल्या तेव्हा यादवच्या बॅगेत 0.32 बोरची आठ जिवंत काडतुसे सापडली. जेट एअरवेजचे विजय प्रकाश अहिरे यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिस निरीक्षक अशोक सोनवणे, उपनिरीक्षक नेताजी गंधारे यांनी यादवला अटक करून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदवला.