आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राईट टू रिजेक्‍ट'चा निर्णय स्‍वागतार्ह- खासदार सुप्रिया सुळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्‍ट्रवादीच्‍या खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारांना नाकारण्‍याचा अधिकार मतदारांना देण्‍याच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे स्‍वागत केले असले तरी असे करणे म्‍हणजे आपले मत वाया घालवण्‍यासारखेच आहे, असे म्‍हटले आहे. उमेदवारांना रिजेक्‍ट करून मत वाया घालण्‍यापेक्षा मतदान करणे कधीही चांगले ठरेल अशी पुस्‍तीही त्‍यांनी यावेळी जोडली. दैनिक दिव्‍य मराठीच्‍या औरंगाबाद कार्यालयाला खासदार सुळे यांनी सदिच्‍छा भेट दिली. त्‍यावेळी त्‍यांनी वरील वक्‍तव्‍य केले.

महिलांच्‍या सुरक्षेबाबत बोलताना त्‍यांनी राज्‍यातील युवतीना स्‍वसंरक्षणासाठी तीन महिन्‍याचा नियमित प्रशिक्षण देण्‍याचा कार्यक्रम सुरू असल्‍याची माहिती दिली. महिलांनी ठरवलं तर काय होऊ शकते हे मागील वेळी बिहार निवडणूकीवेळी दिसून आले आहे. महिलांच्‍या एक गठ्ठा मतदानामुळेच त्‍यांचे सरकार पुन्‍हा सत्तेत आले, असे त्‍यांनी सांगितले. अन्‍न सुरक्षा विधेयकाप्रमाणेच आता पाणी विधेयक आणण्‍याची गरज भासणार असल्‍याची जाणीवही त्‍यांनी करून दिली. काही दोष नसताना राज्‍याचे गृहमंत्री आर. आर पाटील यांना बांगडया पाठवणे चुकीचे असल्‍याचे खासदार सुळे यांनी म्‍हटले.