आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्रा समोर आला; रिक्षा पलटी होऊन चालक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रिक्षासमोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजता चिकलठाण्यातील हिनानगर येथे ही घटना घडली. जावेद हमीद शेख (२५) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. 
 
बुधवारी रात्री जावेद रिक्षा घेऊन गॅस भरण्यासाठी पंपावर गेला. तेथून परत येताना चिकलठाणा आठवडी बाजाराजवळ त्याच्या रिक्षासमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा उलटली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनेची नोंद केली. 
 
वृद्धाचा अपघाती मृत्यू 
जळगावरस्त्यावरून गुरुवारी दुपारी पायी जाणाऱ्या वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात भास्कर प्रसाद पांडे (६०, रा. एन-६) यांचा मृत्यू झाला. पांडे हे गरवारे कंपनीसमोरून पायी जात हाेते. या वेळी समोरून येणाऱ्या चारचाकीने त्यांना धडक देत पोबारा केला
बातम्या आणखी आहेत...