आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riot Charge Filed Against MLA Imtiyaz Jalil Along With 100 Peoples'

आमदार इम्तियाज जलील यांच्यासह शंभर जणांवर दंगलीचा गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वक्फ बोर्डाच्या जागेवरील हरप्रीतसिंग यांच्यासह इतरांनी लावलेले फलक उखडून फेकल्याप्रकरणी आमदार इम्तियाज जलील यांच्यासह शंभर जणांविरोधात दंगलीचा, तर वक्फच्या जागेवर तारेचे कुंपण लावून कब्जा करणाऱ्या हरप्रीतसिंग यांच्यासह इतरांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आमदार इम्तियाज जलील इतरांसोबत बैठक घेऊन वक्फ बोर्डाला त्यांच्या जमिनी तातडीने ताब्यात घेण्याचे निर्देश दिले.
क्रांती चौकानजीकच्या सर्व्हे क्रमांक ७७ वर वक्फ बोर्डाची एकर २२ गुंठे जागा आहे. यापैकी काही जागेवर हरप्रीतसिंगसह चार जणांनी ताबा केला होता. त्यांनी या ठिकाणी कुंपण लावून फलक रोवले होते. न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०१४ मध्ये वक्फच्या बाजूने निकाल देऊनही हरप्रीतसिंग यांनी ती जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी वक्फ बोर्डाचे अधिकारी कर्मचारी मूग गिळून गप्प बसले होते. यामुळे शुक्रवारी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह काही नगरसेवक कार्यकर्त्यांनी कुंपण, टपऱ्या रोवलेले फलक उखडून टाकले. या घटनाक्रमामुळे परिसरात दंगलसदृश स्थिती निर्माण झाली होती. यामुळे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह इतर शंभर जणांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

'वक्फ'च्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले
पोलिस आयुक्तांनी आ. इम्तियाज जलील यांना तुम्ही तोडफोड का केली, असा सवाल केला असता आमदारांनी सांगितले की, वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हरप्रीतसिंग यांच्याकडून पैसे खाल्ले. यामुळे त्यांनी जागा ताब्यात घेतली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज हुसेन यांनी अफरातफर केली असल्याचा आरोप वक्फचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिज अहेमद यांनी केला होता, असेही आ. इम्तियाज यांनी सांगितले. वक्फचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिज अहेमद यांनी वक्फच्या जमिनी ताबडतोब ताब्यात घेण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. बैठकीला हरप्रीतसिंग, त्यांचे वकील, काही भाडेकरू, आमदार इम्तियाज जलील, वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिज अहेमद, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती उपस्थित होते.
पुढे वाचा... पोलिस आयुक्तांनी घेतली बैठक