आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता दुभाजकावर कार आदळून सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांची इंडिगो कार रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. ही घटना 2 नोव्हेंबरला मध्यरात्री बारा वाजता चिकलठाणा विमानतळासमोर घडली. अण्णा रावसाहेब टेकाळे (26, पाटोदा, जिल्हा बीड) असे मृताचे नाव आहे.

अपघातात जखमी झालेले चार जवान अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने (एमएच-33ए-1664) कार दुभाजकावर जाऊन आदळली. दिवाळीनिमित्त गावाकडे लवकर पोहोचता यावे म्हणून त्यांनी कार भाड्याने घेतली होती. गडचिरोली ते औरंगाबादपर्यंत सुमारे 600 कि. मी. चा प्रवास करून ते शहरात दाखल झाले होते. या अपघातात कार उलटून पन्नास ते साठ फूट फरपटत गेली. जखमी झालेले जवान शेवगाव, नेवासा आणि नगर येथील रहिवासी आहेत. गौतम खिल्लारे, अजय क्षीरसागर, नामदेव बडे आणि ज्ञानेश्वर गवारे अशी त्यांची नावे आहेत. जखमींवर घाटीत उपचार सुरू आहेत. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.