आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव 407 ची दुचाकी चालकाला धडक, पाहा टु व्‍हिलरची अशी झाली अवस्‍था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील जालना रोडवरील सेव्‍हन हील उड्डाण पुलावर आज दुपारी 2.45 च्‍या दरम्‍यान भीषण अपघात झाला आहे. एका 407 मॅटेडोरने दुचाकीचालकाला मागून जबर धडक दिली आहे. दुचाकीचालक या अपघातात गंभीर जखमी झाला, असून त्‍याला एमजीएम हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आल्‍याची माहिती प्रत्‍यक्षदर्शींनी दिली.
- या अपघाताबाबत प्रत्‍यक्षदर्शींनी प्राथमिक माहिती दिली.
- एम एच 27 जी. 5205 हा दुचाकी चालक बाबा पेट्रोल पंपाकडे जात होता.
- मागून भरधाव येणा-या 407 मॅटेडोरने दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली.
- त्‍यानंतर 407 मॅटेडोरचालक घटनास्‍थळाहून सुसाट वेगाने बाबा पेट्रोल पंपाकडे निघाला.
- परिसरातील काही लोकांनी जखमी चालकाला एमजीएम हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केले.
- घटनास्‍थळावर तत्‍काळ पोलिस दाखल झाले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, अपघाताचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...