आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड महामार्गावरील दुचाकी अपघातात दोन जण ठार, एक गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- सिल्लोड महामार्गावरील नायगाव जवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात मंगळवारी दि.२१ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. या अपघात निलेश गणेश पांडे वय २४ रा.वडोदबाजार संतोष रामदास पवार रा.साताळ पिंप्री वय २५ हे तरुण ठार झाले आहेत. तर राजू अंबादास ऋषी वय २२ रा.वडोदबाजार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, तालुक्यातील वडोदबाजार येथे संपन्न होणाऱ्या एका लग्न समारंभासाठी मोटारसायकल क्र.एम.एच. २० डी.एम.७३८० तर दुसरी मोटारसायकल क्रमांक स्पष्ट दिसत नाही यांच्यात समोरासमोर जबर धडक होऊन त्यात दोन तरुण हे ठार झाले आहेत. तर राजू अंबादास ऋषी हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय (घाटी) येथे दाखल करण्यात आले आहे. महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी याने जखमी मयतांना रुग्णालयात दाखल केले. या बाबत सहायक फाैजदार एस.एस.साळवे पुढील तपास करीत आहे. 
बातम्या आणखी आहेत...