आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी-अ‍ॅपेच्या धडकेत 3 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - मालवाहतूक करणारी अ‍ॅपेरिक्षा व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. हर्सूलसावंगी बसस्थानकासमोर हा अपघात झाला.

दादाराव विश्वनाथ शिरसाट (26, पिंपळगाव वळण), अंकुश उत्तमराव सोटम (50, कान्होरी, ता. फुलंब्री) हे दुचाकीने (एमएच 20 एसी 6496) फुलंब्रीकडे जात होते, तर अ‍ॅपेरिक्षामधून (एमएच 20 एटी 7533) विकी राहुल ठोंबरे (25, रामनगर) हा वांगीहून (ता. सिल्लोड) औरंगाबादकडे येत होता. रविवारी रात्री दहाच्या सुमारास सावंगी बसस्टँडसमोर हा अपघात झाला. यात दुचाकीस्वार दादाराव व अंकुश व अँपेरिक्षातील विकी ठोंबरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अँपेरिक्षात पुन्हा चार प्रवासी होते. त्यात श्रावण शेरूडकर, विनोद हिवराळे यांना किरकोळ मार लागला.