आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन - औरंगाबाद-पैठण रस्त्यावर निरंजन कंपनीसमोर पैठणकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर सात वर्षांचा चिमुकला या गंभीर जखमी झाला.

निलजगाव येथील रामभाऊ विनायक कुसेकर सोमवारी नाथषष्ठी उत्सवातील दिंडीला जेवणाची पंगत देऊन निलजगावकडे मुलगा नंदू व नातू बंडू यांच्यासोबत दुचाकीने निघाले होते. निरंजन कंपनीजवळ समोरून येणार्‍या ट्रकने (एमएच 31 सीबी 8062) धडक दिली. यात रामभाऊ कुसेकर (51), नंदू कुसेकर (32) जागीच ठार झाले, तर नातू बंडू कुसेकर (7) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामभाऊ कुसेकर हे दरवर्षी नाथषष्ठीमध्ये येणार्‍या एका दिंडीस काल्याच्या दिवशी पैठण येथे येऊन पंगत देत असत. सोमवारीदेखील दरवर्षीप्रमाणे त्यांनी दिंडीला पंगत दिली.