आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅचवर्क केले अन् पावसात वाहूनही गेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नेमेची येतो पावसाळा, नेमेची बनतात रस्ते, तरीही नेमेची दिसतात खड्डे.. औरंगाबाद शहराला लागू पडणारे हे समिकरण. यावेळी मात्र कहरच झाला.. बाप्पाच्या स्वागतासाठी सकाळी केलेले पॅचवर्क संध्याकाळपर्यंतही तग धरू शकले नाही. त्यामुळे साडे पाच कोटींचे बजेट असूनही शहरभर खड्डे का असतात उघड करत आहोत. त्याच त्या ठेकेदारांकडून केले जाणारे निकृष्ट काम, त्याच त्या दिखाव्याच्या कारवाईने कसे फोफावले त्याचा हा पर्दाफाश..
नागरिकांना खड्डयांचा त्रास होऊ नये यासाठी विविध वॉर्डातील अंतर्गत आिण मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेटमिक्स मॅकॅडम पद्धत वापरून अनेक भागात पॅचवर्कही झाले. पण हे वेटमिक्स नसून लोकांच्या डोळ्यात ‘चिखलफेक’असल्याचे डीबी स्टारच्या तपासातून उघड झाले आहे. काम सुरू असताना हे काम गेले वाहून गेले
सुरुवातीला अरोरा कन्स्ट्रक्शनमार्फत वॉर्ड ई अंतर्गत सिडको एन-२ कामगार चौक ते सोहम मोटर्स, वॉर्ड ब अंतर्गत हडको एन-१२ टीव्ही सेंटर ते हडको कॉर्नर, हर्सुल टी पॉइंट शिवगिरी सोसायटी ते ऑडिटर सोसायटी, मयुर पार्क परिसरातील शिवेश्वर कॉलनी ते मयुरपार्क रोड, िसडको एन-७ आंबेडकरनगर ते बळीराम पाटील शाळा, पिसादेवी रोड, सिडको एन-६ आझाद चौक ते बजरंग चौक आिण माता मंदिर ते ओम प्राथमिक शाळा (आिवष्कार कॉलनी रोड), टीव्ही सेंटर ते सलील अली सरोवर या रस्त्यांचे खड्डे आठवड्यापूर्वी बुजवण्यात आले, मात्र सकाळी काम केले आिण संध्याकाळी वाहून गेले. काही ठिकाणी पावसामुळे चार दिवसातच ते वाहून गेले. त्यामुळे या सर्व मार्गांवरील मोठमोठे खड्डे उघडे पडले आहेत. या गैरप्रकाराने पािलकेच्या अिधकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आिण ठेकेदारांचे निकृष्ट काम उघड होते.
पुन्हा पॅचवर्क करू
पावसाळयात डांबरीकरण करता येत नाही.त्यामुळे वेटमिक्स मॅकॅडम या प्रकारात मुरुम, खडी, डबर टाकून तात्पूरते पॅचवर्क करत आहोत. पावसाचा जोर कमी झाला की, आम्ही ते मटेरियल पुन्हा खड्डयातून काढून तेथे डांबराचे पॅचवर्क करणार आहोत
सिकंदर अली, कार्यकारी अिभयंता, मनपा
२०१४-१५ च्या पॅचर्वकसाठीची तरतूद आिण ठेकेदार
वार्ड अ : वार्ड अ अंतर्गत केबल खोदकामामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी २४ लाख २५ हजार ५८२ तर दुसऱ्या टप्प्यात याच कामासाठी २१ लाख १४ हजार ६६६६ रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. के. बी. पाथ्रीकर, अरोरा कन्स्ट्रक्शन यांना हे काम देण्यात आले आहे. २६ जून २०१४ रोजी कार्यादेश देण्यात आले. वार्ड क्रमांक १, ४, १३, ३०, ३१, ३२ यासाठी ४५ लाख १८ हजार ६९५ रुपये तर वॉर्ड क्रमांक ५,ते वॉर्ड क्रमांक १२ पर्यंत रस्त्यांची दुरुस्ती व पॅचवर्कसाठी ४५ लाख २६ हजार २७० रुपयाचे अंदाजपत्रक तयार आहे.
वॉर्ड ब : वॉर्ड ब अंतर्गत पिसादेवी रोडपर्यत, सिडको एन-६ आझाद चौक ते बजरंग चौक आिण माता मंदिर ते ओम प्राथमिक शाळा या रस्त्याचे डांबरी पॅचवर्कच्या नावाखाली वेटिमिक्स करण्यात आले. यासाठी २४ लाख ९६ हजार ७०० रुपयांची तरतूद करण्यात आली. िशवाय केबल कामामुळे नादुरूस्त झालेल्या रस्त्याची डांबरी पॅचवर्क करण्यासाठी ९ लाख ५८ हजार ६०० तर कॉक्रीट रस्ते, पेव्हरब्लॉक , खडी रस्ते या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी २४ लाख ५८ हजार २४३ रूपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. ५ टक्के जास्त दराने अरोरा
कन्स्ट्रक्शनलाच हे काम देण्यात आले. या कामासाठी ८ जून २०१४ रोजी कार्यादेश दिले होते.
वॉर्ड क : वॉर्ड क अंतर्गत रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी ४८ लाख २० हजार ८६५ रुपयांची तरतूद आहे.हे काम ए. एस. कन्सट्रक्शनला देण्यात आले आहे. केबल खोदकाम झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व पेव्हरब्लाकसाठी २० लाख ९६ हजार ४१० रुपयांची तरतूद आहे . ही दोन्ही कामे ए. एस. कन्स्ट्रक्शन करणार आहे.
वॉर्ड फ: वॉर्ड फ अंतर्गत येणाऱ्या आठ प्रभागातील विविध रस्त्याचे डागडुजी करणे. वॉर्ड क्रमांक ५०, ६६,६७,६८,६९,८५,८६ आणि ९९ यातील विविध रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी ३९ लाख ४० हजार ५९२ तर दुसऱ्या टप्प्यात वॉर्ड क्रमांक ८७,८८,८९,९०,९२,९३,९६,९७ आणि ९८ यासाठी ३९ लाख ९७ हजार ५९० रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. हे काम आदिनाथ कन्ट्रक्शन यांना देण्यात आले, मात्र डांबराऐवजी येथे जीएसबी ग्रॅन्युरल सबबेसमध्ये पॅचवर्क केले जात आहे.
वॉर्ड ड: अंतर्गत वििवध ठिकाणी वॉर्डातील मुख्य रस्त्यांचे पॅचवर्क व मजबुतीकरण करण्यासाठी अंदाजपत्रकात ४४ लाख ७५ हजार ९३२ रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी ए. एस. कन्ट्रक्शनला ५ टक्के कमी दराने २३ जुलै २०१४ रोजी काम देण्यात आहे. तर वॉर्ड क्रमांक ३३, ३६,३७,३८ ३९,५८,५९ आणि ६० मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी २४ लाख ८३ हजार ४०० रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. वॉर्ड क्रमांक ६१, ६२,६३,६४,६५,९१,९४,९५ साठी २१ लाख ८५ हजार २४४ रुपयाचे अंदाजपत्रक तयार आहेे. ही कामे एम. ए. सिद्दीकी यांनाच देण्यात आली आहेत. १८ जुलै २०१४ रोजी त्यांना कार्यादेश देण्यात आले.
वार्ड ई
वार्ड ई अंतर्गत १७ प्रभागासाठी ५० लाखाची तरतूद आहे. अरोरा कस्ट्रक्शनला ही कामे देण्यात आली आहेत.