आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ डिसेंबरला मराठवाड्यातील रस्त्यांच्या विकासाची घोषणा शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी पुढील शुक्रवारी (२५ डिसेंबर) औरंगाबाद जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते औरंगाबाद-जळगाव या नियोजित विस्तीर्ण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे. हा प्रकल्प नेमका कसा असेल याचबरोबर मराठवाडा, नजीकचा खान्देश या भागातील आणखी रस्त्यांच्या कामाची घोषणा या वेळी होऊ शकते. एकूण २१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा येथे होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ही कामे केली जाणार असल्याने या निमित्ताने या प्राधिकरणात गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू आहे. जालना येथील ड्रायपोर्टच्या कामाचा शुभारंभही याच दिवशी केला जाणार असून त्याची जबाबदारीही याच प्राधिकरणाच्या खांद्यावर आल्याने अधिकाऱ्यांची धावपळ आणखीनच वाढली आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसे, स्थानिक आमदार अतुल सावे यांनी रेटा लावल्यामुळे औरंगाबाद-जळगाव या रस्त्याच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गडकरी यांनी स्वत: औरंगाबादेत येऊन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी २५ डिसेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. या वेळी नेमक्या किती प्रकल्पांची घोषणा होईल, हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. गडकरी आणखी काही घोषणा येथे करू शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे.

जालन्यातील ड्रायपोर्टचे भूमिपूजन करतानाच गडकरी यांच्या हस्ते जालना-राजूर तसेच अन्य रस्त्यांच्या कामाचेही भूमिपूजन होणार असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबाद येथील कार्यक्रम जालना रस्त्यावरील केम्ब्रिज शाळेजवळ होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. रस्ते विकास मंत्रालयाकडून कार्यक्रमाचे स्थळ निश्चित केले जाणार आहे. ते अजून पक्के झालेले नाही.

कामे लगेच सुरू होतील
^येडशी-औरंगाबाद या रस्त्याचे काम सुरू आहे. औरंगाबाद-धुळे या रस्त्याचे भूमिपूजन येथे होत आहे. केंद्राकडे निधीची कमतरता नाही. त्यामुळे ही कामे लगेचच सुरू होतील. - अतुलसावे, आमदार,भाजप.

त्याचबरोबर चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे हे खासदार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातील प्रत्येकी तीन रस्त्यांचे भूमिपूजन

{औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन
{औरंगाबाद-पैठण महामार्ग
{दौलताबाद-वैजापूर येवला-मार्ग
{औरंगाबाद-अजिंठा-जळगाव महामार्ग
{चिकलठाणा ते गोलवाडी नाका, चौपदरीकरण तसेच त्यात येणारे पाच उड्डाणपूल.
बातम्या आणखी आहेत...