आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला देणार कचर्‍याचे वाण; ‘लोकनीती मंच’चा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रस्त्यांच्या वाईट अवस्थेला कारणीभूत असलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांना मकर संक्रांतीनिमित्त महिलांच्या हस्ते कचर्‍याचे वाण देणार असल्याचा इशारा लोकनीती मंचचे नेते श्रीकांत उमरीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

रस्त्यांच्या दुर्दशेसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे निगरगट्ट धोरण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. मनपाने क्रीडास्पर्धा, जायंट्स इंटरनॅशनलसारख्या श्रीमंत समाजसेवी संस्थांना देणग्या देण्याचा निर्णय घेतला. याचा निषेध म्हणून नागरिक कर भरणार नाहीत असा निर्धार केला आहे. रस्तेप्रश्नी जनआंदोलन उभारण्यासाठी मंचच्या वतीने 29 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता गोविंदभाई र्शॉफ सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन विनय हर्डीकर यांच्या हस्ते होईल. तसेच ‘भ्रष्टाचारमुक्त भारत हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होईल. या आंदोलनाला ‘आप’चा पाठिंबा असल्याचे उमरीकर म्हणाले.

खराब रस्त्यांमुळे 25 रिक्षाचालकांना व्याधी झाली आहे. या रिक्षाचालकांची मंचच्या वतीने गोविंदभाई र्शॉफ सभागृहात सकाळी 11 ते 3 या वेळेत आरोग्य तपासणी करण्यात येईल, असे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीचे निसार अहमद, लाल बावटा रिक्षाचालक संघटनेचे अ. सलीम यांनी दिली. अस्थिरोग तज्ज्ञ संघटनेचे डॉ. सचिन फडणीस, डॉ. संतोष रंजलकर, डॉ. मंगेश पानट, डॉ. कोलते तपासणी करतील.