आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते दुरुस्तीसाठी सवड नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - देशभरातील जड वाहने ज्या रस्त्यांनी दररोज ये-जा करतात, त्या वाळूज एमआयडीसीतील चाळणी झालेल्या रस्त्यांचे काम सुरू करण्यासाठी एमआयडीसीला सवड मिळत नाही. परिणामी परिसराशी संबंधित सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत.

20 वर्षांपूर्वी एमआयडीसीने या रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. आता नव्याने डांबरीकरणावर 17 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. पावसाळा संपताच डांबरीकरण केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे आंदोलन करण्याचा ईशारा नागरिकांनी दिला आहे.

कामगार व उद्योजकांची नाराजी
एमआयडीसी कारखानदारांकडून कर वसूल करते. मात्र, या कराच्या प्रमाणात एमआयडीसी प्रशासनाकडून आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप उद्योग क्रांती उद्योजक संघटनेचे सुरेश फुलारे यांनी केला आहे. उद्योगांसाठी लागणारा कच्चा आणि पक्का माल वाहून नेणारी वाहने खड्डय़ांमधून गेल्यास मालाचे नुकसान होते.

कोट्यवधी कुठे खर्च होतात ?
एमआयडीसी प्रशासनाला कररूपाने क ोट्यवधी रुपये मिळतात. सदरील पैसा सोयी-सुविधांवर खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, हा कराचा पैसा कुठे खर्च होतो, असा प्रश्न लघुउद्योजक फुलारे यांनी उपस्थित केला. ओअँसिस चौकापासून ई-सेक्टर ऑटोक्लस्टरपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कामगारांना दुचाकीवर जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

मुंबईत तीव्र आंदोलन करण्यात येईल
छावाच्या वतीने वेळोवेळी डांबरीकरणाचा प्रश्न उपस्थित केला. जानेवारी 2013 मध्ये दोनदिवसीय उपोषणही करण्यात आले होते. त्या वेळी पावसाळा संपताच डांबरीकरणाचे काम करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आले होते. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही तर मुंबई गाठून एमआयडीसी मुख्य कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शिवाजी मार्कंडे, अखिल भारतीय छावा र्शमिक संघटना, प्रदेश उपाध्यक्ष

दोन महिन्यांत काम सुरू होण्याची शक्यता
डांबरीकरणाच्या कामावर 17 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयातून हालचाली सुरूही झाल्या आहेत. येत्या दोन महिन्यांत काम सुरू होण्याची शक्यता आहे. राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी