आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सहा रस्ते राष्ट्रीीय महामार्गाशी जोडले जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील सहा रस्ते राष्ट्रीीय महामार्गाशी जोडले जाणार आहेत. याबाबतचा निर्णय झाला असून त्यासंबंधीचा एक मेल दिल्लीच्या राष्ट्रीीय महामार्ग प्राधिकरणाने औरंगाबाद प्राधिकरणास पाठवला आहे. यात संबंधितांनी हे प्रस्ताव तातडीने नियोजन विभागाकडे सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. यापैकी शिर्डी-औरंगाबाद या रस्त्याचे काम त्वरित करता यावे यासाठी नियोजन केले जात असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले.
गडकरी यांनी राष्ट्रीीय महामार्ग व बंदरे खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्राधिकरण अधिकार्‍यांची दिल्लीत बैठक घेतली. यापुढे कोणत्याही राज्याचा प्रस्ताव आल्यास सरकारी कारण पुढे न करता मार्ग काढून इतर विभागांच्या मदतीने तो पूर्ण करण्याची तयारी ठेवावी. नियमात बसत असेल आणि राज्याच्या विकासाला मदत होणार असेल तर कोणत्याही राज्याचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक राज्यात कार्यरत असलेल्या राष्ट्रीीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेऊन राहिलेली शहरे महामार्गाशी जोडण्यासाठी प्रस्ताव मागवावेत, असे आदेशही त्यांनी दिले. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी घोटी- सिन्नरसह काही मार्गांसाठी महामार्ग प्राधिकरणाकडे पूर्वी पाठपुरावा केला होता.
राज्यातील जी शहरे राष्ट्रीीय महामार्गाशी जोडलेली नाहीत त्याचा अहवाल नियोजन विभागाकडे सादर करण्यास गडकरींनी बजावले आहे. औरंगाबाद प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी त्याच दिवशी अहवाल नियोजन विभागाकडे सादर केला.

हे आहेत सहा मार्ग
> घोटी - सिन्नर
> शिर्डी - औरंगाबाद
> पुणे- अहमदनगर- औरंगाबाद- जालना- मालेगाव- कारंजा- वर्धा- बुटीबोरी
> औरंगाबाद- सिल्लोड- पहूर- बोदवड- मुक्ताईनगर- बुर्‍हाणपूर-
खंडवा
> गुहागर पोर्ट - चिपळूण- पाटण- कराड-विटा-
जत- विजापूर
> नांदेड- मुखेड- धर्माबाद- बासर- निझामाबाद- डिचपल्ली
या मार्गांचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.

शिर्डी मार्गाला अग्रक्रम
प्रस्तावित राष्ट्रीीय महामार्गापैकी शिर्डी-औरंगाबाद या मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. देशभरातून येणार्‍या साईभक्तांची सोय व्हावी आणि अजिंठा- वेरुळ लेणी पाहण्यासाठी मराठवाड्यातील सर्व रस्ते महामार्गाशी जोडण्याच्या कामाला यात प्राधान्य देण्यात आले आहे.