आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 कोटी खर्चून शहरातील रस्ते करणार गुळगुळीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खड्ड्यांत रस्ते की रस्त्यांत खड्डे हा वाद निकाली काढण्याचे महानगरपालिकेने ठरवले आहे. येत्या अडीच महिन्यांत 50 कोटी रुपये खर्चून 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातील किमान निम्मे रस्ते मार्च संपण्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यामध्ये चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील 13 किलोमीटर, तर शहरातील 22 किलोमीटर रस्त्याचा समावेश आहे. त्यातील काही कामे प्रगतिपथावर असून या महिनाअखेर काहींचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. उर्वरित रस्त्यांचे काम मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून अडथळा आला नाही तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी 35 किलोमीटरच्या रस्त्यांचे काम पूर्ण झालेले असेल. ही कामे डिफर पेमेंटवर करण्यात येत आहेत. पाच वर्षांत देखभाल- दुरुस्तीचा खर्च कंत्राटदाराला करावा लागणार आहे. त्यामुळे आता झालेले हे रस्ते आगामी पाच वर्षे गुळगुळीत राहतील, असा विश्वास आहे.
या रस्त्यांचे होणार काम
*चिकलठाणा औद्योगिक वसाहत -13 किलोमीटर
*वरद गणेश मंदिर ते सिल्लेखाना
*रोशनगेट ते राममंदिर
*कैलासनगर ते एमजीएम
*क्रांती चौक ते रेल्वेस्थानक
*कोकणवाडी ते पंचवटी चौक
*ओंकारेश्वर मंदिर ते गारखेडा
*गारखेडा ते सूतगिरणी
*त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी
*गजानन महाराज मंदिर ते चेतक घोडा चौक
*सिडकोतील ओंकार गॅस ते बळीराम पाटील शाळा, कॅनॉट प्लेसमधील अंतर्गत रस्ते