आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊस थांबताच धुळीचे लोट; औरंगाबादकर त्रस्त, त्वचारोग, डोळ्यांच्या रुग्णात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे रस्ते कोरडे झाले असून शहरातील विविध भागांत धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे त्वचारोग, डोळ्यांत जळजळ होणे, केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. अस्थमा आणि दम्याने त्रस्त असलेल्यांना घराबाहेर पडणेही कठीण झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत धुळीचे प्रमाण तिपटीने वाढले आहे.

शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने खड्डय़ांत चिखल साचून ते वाळल्यानंतर हवेच्या प्रवाहाबरोबर धुळीचे लोट उठत आहेत. अनेक भागांत जुन्या इमारती पाडण्यात आल्याने बांधकाम साहित्याचे ढीग रस्त्यावरच पडून आहेत.

धुळीच्या प्रदूषणाची कारणे
0रस्त्यांची प्रचंड दुरवस्था
0दुभाजकांमध्ये कचरा टाकणे
0वाहनांमध्ये रॉकेलचा वापर
0रस्त्यावर वाळलेला चिखल

वेळ प्रतितास हवेचा वेग
11.30 12 किलोमीटर
1.30 10 किलोमीटर
2.30 10 किलोमीटर

अशोकाची झाडे लावा
बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त टाकल्याने आणि वाहनांच्या गर्दीमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील धूळ घरात जाऊ नये म्हणून अशोकाची लागवड करावी यापासून 20 टक्के धुळीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
-प्र. म. जोशी, प्रादेशिक अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ.

धुळीचे प्रदूषण विविध आजारांना निमंत्रण
धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि डोळ्यात जळजळ होते. धूळ घशात गेल्यास घशाचे आजारही उद्भवतात. त्यामुळे धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
-डॉ. भागवत कराड, तज्ज्ञ.