आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यभरात \'मनसेची\' टोलधाड; मुंबई - पुणेसह, औरंगाबाद, नागपूर टोलनाके तोडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी मुंबई येथे काल झालेल्‍या जाहीर सभेत, 'राज्‍यभरामध्‍ये टोल भरू नका कुणी आडवे आले तर फोडून काढा' असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. या आवाहनानंतर राज्‍यभर मनसे कार्येकर्त्‍यांनी टोलनाक्‍याची तोडफोड सुरु केली आहे.


मुंबई,ठाणे, कल्‍याण, एरोली, मुलुंड तळेगाव टोलनाक्‍याची तोडफोड करण्‍यात आली.

रायगड- खालापूर टोलनाक्‍याची तोडफोड करण्‍यात आली.

नागपूर - हिंगणा, वाडी ते दाभा आणि कळमेश्‍वर येथील टोलची तोडफोड करण्‍यात आली.

पुणे- चांदणी चौकच्‍या टोलनाक्‍याची तोडफोड करण्‍यात आली.

जालना - मंठा रोडवरील पिंपरी टोल नाक्याची तोडफोड करण्‍यात आली.

औरंगाबाद - करमाड येथील टोलनाक्यावर दगडफेक करण्‍यात आली.

बीड- आष्टीचा टोलनाक्‍याची तोडफोड करण्‍यात आली.

नांदेड- बिलोली टोलनाक्याची तोडफोड करण्‍यात आली.

पुढील स्‍लाइडवर पाहा, टोलनाक्‍याची झालेली तोडफोड...