आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅचवर्कसाठी प्रत्येक वॉर्डाला लाख!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील११५ वॉर्डांना पॅचवर्कसाठी प्रत्येकी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक वॉर्डात कामही सुरू झाले आहे. मोठे खड्डे असतील तर सिमेंटचे क्रॉँक्रिटीकरण, मध्यम असतील तर डांबराचे लहान असतील, तर मुरूम खडीचे पॅचवर्क करण्याचे काम सुरू झाले आहे.
शहरातील जीवघेण्या खड्ड्यांचा त्रास संपता संपत नव्हता, त्यामुळे डीबी स्टारने ‘हे आहेत शहरातील दहा ‘उत्कृष्ट’ खड्डे’ या मथळ्याखाली उपरोधिक वृत्त प्रसिद्ध करून मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जोरदार चपराक लगावली. याशिवाय ही उत्कृष्टता शहराला शोभणारी आणि शहरवासीयांना मानवणारी नसल्याने आपण पुढाकार घेऊन तात्पुरती डागडुजी करू शकता, असे आवाहनही तमाम नागरिकांना केले. सारे शहरवासीय पुढे आले. जागोजागी लोकांनी स्वत:च खड्डे बुजवायला सुरुवात केली. अनेक वसाहतींत तर लोक एकत्र आले वर्गणी करून त्यांनी खड्डे बुजवले. त्याला एक प्रकारच्या आंदोलनाचे स्वरूप आले. त्यामुळे मनपा अधिकारी नगरसेवकही हैराण झाले. साऱ्या शहरात खड्ड्यांचीच चर्चा होत होती. अखेर आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शहरातील झोनमधील सर्व ११५ वॉर्डांमधील पॅचवर्कसाठी तब्बल कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रत्येक वॉर्डासाठी लाख रुपयांचा निधी ठेवण्यात आला
बातम्या आणखी आहेत...