आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच करणार पॅचवर्क, डांबर प्लँटही उभा करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खड्डेयुक्तरस्त्यांची दुरवस्था संपवण्यासाठी मनपाने पॅचवर्क करण्यासाठी आपलाच डांबर प्लँट सुरू करण्याचा सहा झोनसाठी सहा पथके तयार करून आपणच पॅचवर्क करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दरसाल पॅचवर्कवर होणारा सहा कोटी रुपयांचा खर्च वाचणार असून मनपाला फक्त साडेतीन कोटी रुपयेच खर्च येणार आहे.

शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे, पॅचवर्कचे काम करायला पैसे नाहीत, पैसे नाहीत म्हणून ठेकेदार काम करीत नाहीत अशा दुष्टचक्रामुळे शहरात खड्ड्यांचे राज्य निर्माण झाले आहे. यावर उतारा म्हणून मनपाने दहा वर्षांपूर्वी ठेकेदारांच्या भल्यासाठी बंद केलेली पॅचवर्क पथके पुन्हा स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या कामासाठी लागणाऱ्या डांबरनिर्मितीचा प्लँटही उभा केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव काल सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आला होता. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘दिव्य मराठी’ने वारंवार पाठपुरावा केला होता. त्यात या पथकांची निर्मिती केल्यास मनपाचे काम अधिक सोपे होईल असा उपाय सुचवला होता. त्याची अंमलबजावणी मनपाने केली आहे.

या प्रस्तावानुसार कोटी लाख रुपये खर्च करून मनपा डांबर प्लँट उभा करणार असून त्याची क्षमता ३० ते ३५ टनांची असणार आहे. या शिवाय सहा झोननिहाय सहा पथके पॅचवर्कसाठी तयार केली जाणार आहेत. प्रत्येक पथकात दहा जणांचा समावेश असणार आहे. या पथकासाठी आठ टिप्पर, रोडरोलर, जेसीबी ट्रॅक्टर लोडर असा ताफा राहणार आहे. एकदा प्लँट सुरू झाल्यावर त्यावर दरसाल कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च मनपाला येणार आहे. सध्या ठेकेदारांना पॅचवर्कसाठी मनपा किमान सहा कोटी रुपये मोजते कामाच्या नावाने बोंब राहते ते वेगळेच. आता आपलीच यंत्रणा उभी करून मनपा खड्डे निर्मूलन मोहीम हाती घेणार आहे. परिणामी प्लँट पथके कार्यान्वित झाल्यावर शहरातील खड्ड्यांची संख्या निश्चित कमी होईल, असा दावा शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी केला आहे.

एक नजर रस्त्यांवर
{रस्त्यांची एकूण लांबी :१४०० किमी
{डांबरीरस्त्यांची लांबी :७०० किमी
{पॅचवर्कवर होणारा खर्च : दरवर्षीकिमान कोटी
{प्लँटच्या निर्मितीचा खर्च : कोटीलाख रुपये
{प्लँटसाठीदरवर्षीचा खर्च : कोटी६५ लाख रुपये
{वाचणारीरक्कम : दरवर्षीकिमान कोटी ५० लाख