आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roads, The City Asked For The Development Of A Thousand Million,

रस्ते, शहर विकासासाठी एक हजार कोटी मागितले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-रस्त्यांसह शहर विकासासाठी केंद्र सरकारने किमान एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे करण्यात आली. जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेले फर्नांडिस दुपारी गांधी भवनात आले होते. पक्षाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या मागणीवर निश्चित विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शहराची कशी अवस्था झाली आहे आपण बघितलेच आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत विरोधकांची सत्ता आहे. त्यामुळे विकास ठप्प झाला आहे. रोजगार निर्मितीही मंदावली आहे. शहराच्या विकासासाठी केंद्राने एक हजार कोटी द्यावेत, अशी मागणी शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांनी केली.

या वेळी आमदार सुभाष झांबड व एम. एम. शेख, प्रमोद राठोड, मिलिंद पाटील, जेम्स अंबिलढगे, डॉ. पवन डोंगरे, मीर हिदायत अली, शहराध्यक्ष विमल मापारी, जगन्नाथ काळे, मुशाहेद सिद्दिकी, इब्राहिम पठाण उपस्थित होते.