आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅग पळवणारा चोरटा गजाआड, पाच सेकंदांत बॅग पळवण्यात पटाईत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अवघ्या पाच सेकंदांत कारची काच फोडून पैशाची बॅग पळवणाऱ्या अांतरराज्य टोळीतील एका चोरट्यास गुन्हे शाखा आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. रोहित ऊर्फ कालू दलपत घमंडे (२५, रा. छारानगर, कुबेरनगर, अहमदाबाद) असे चोरट्याचे नाव आहे. वाळूजला ऑक्टोबर रोजी श्रीकृष्ण ब्रह्मे यांच्या कारमधून १५ लाख लांबवल्याची कबुलीही त्याने दिली आहे.

वाळूजच्या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हे शाखेच्या विशेष पथकांना आरोपी पकडण्याचे आदेश दिले होते. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत गुजरातेतील टोळीचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात पोलिसांची मदत घेऊन रोहितला अटक केली. त्याच्याकडून तीन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, उपनिरीक्षक प्रशांत आवारे, भदरगे, सहायक फौजदार नंदकुमार भंडारी, रावसाहेब जोंधळे, धुडकू खरे, सिद्धार्थ, थोरात, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, धर्मराज गायकवाड, रवी खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या टोळीने शहरासह श्रीरामपूर, नाशिक येथे बॅग पळवल्याची कबुली दिली आहे. बँकेबाहेर या टोळीतील सदस्य नजर ठेवून असतात. मोठी रक्कम घेऊन एखादी व्यक्ती बाहेर पडली की ही टोळी तिच्या मागावर राहून अवघ्या तीन ते पाच सेकंदांत पैशाची बॅग चोरून सर्व जण पसार होतात.