आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलनाका दरोड्यातील आरोपी मोकाटच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - नगर-औरंगाबाद महामार्गावर वाळूजलगतच्या जुन्या शिवराई टोलनाक्यावरील दरोड्याचा तपास लावण्यात दोन महिन्यांनंतरही पोलिसांना अपयश आले आहे. 23 सप्टेंबर रोजी पहाटे पावणेपाचच्या सुमारास 8 दरोडेखोरांनी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून सुमारे चार लाख रुपये व सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर बॉक्स लंपास केला होता.

वाळूज, वाळूज एमआयडीसी व सिल्लेगाव पोलिसांनी पाठलाग केल्यामुळे दरोडेखोर तवेरा क ार रस्त्यात सोडून अंधारात पसार झाले होते. मात्र, त्यांनी डीव्हीआर बॉक्स कारमध्येच सोडून दिला होता. डीव्हीआरमधील चित्रिकरणात सर्व दरोडेखोर अगदी स्पष्ट दिसत आहेत. हा दरोडा जवळच्या व्यक्तीच्या मदतीने टाकण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. या घटनेला दोन महिने उलटले आहेत. अनेक पुरावे मिळूनही पोलिसांना मात्र दरोडेखारांचा ठावठिकाणा मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत प्रo्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरोडेखोर टोलनाका कार्यालयात पहाटे पावणेपाचच्या सुमारास तलवारी, खंजीर व पिस्तूल घेऊन आत शिरले. त्यांनी कर्मचार्‍यांना धमकावून रोख चार लाख रुपयांसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स घेऊन तवेरा कारमधून पळ क ाढला होता. आठही दरोडेखोर 20 ते 30 वर्षे वयोगटातील होते. त्यांनी तोंडावर हातरूमाल बांधले होते, तर अंगात टी शर्ट, ज्ॉकेट आणि डोक्यात वुलनच्या टोप्या होत्या. कपाट फ ोडून रोकड ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रीकरण थांबवण्यासाठी सर्व लाइट बंद केले. 15 मिनिटांत दरोडा टाकून ते तवेरा कारमधून पसार झाले. ते लिंबेजळगावपासून वळण घेऊन तुर्काबादच्या दिशेने वेगाने गेले. लासूर नाक्यावर पोलिसांचे वाहन पाहून तवेरा क ार थांबवून दरोडेखोर लगतच्या पिकातून पसार झाले होते.