आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड शहरात दोन घरे फोडली; पोलिसांत तक्रार नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड: कोयत्याचा धाक दाखवून सिल्लोड शहराच्या गुलशननगर भागातील दोन घरे लुटण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. यात लाखाच्या आसपास ऐवज लुटला असून चोरट्यांच्या भीतीने नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली नाही. चौघांनी ही चोरी केली. त्यांचा पोलिस पाठलाग करीत असताना अंधाराचा फायदा घेऊन चोर पळाल्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण तायडे यांनी सांगितले.
सिल्लोड शहरातील भारत गॅस कंपनीच्या गोदामाच्या मागच्या बाजूस असलेल्या गुलशननगर भागात चोरट्यांनी हत्यारांचा धाक दाखवून 95 हजारांचा ऐवज लंपास केल्याचे घरमालकांनी सांगितले. गुलशननगर भागात राहणारे निवृत्त कर्मचारी आबेदखॉं पठाण हे गुरुवार रात्री शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते. घरी दोन महिला व एक मुलगा होता. रात्री 2 वाजेच्या सुमारास घराचा कोयंडा तोडून पाच ते सहा जणांनी घरात प्रवेश केला. हत्यारांचा धाक दाखवत आवाज करू नका, असे दरडावून रोख दहा हजार पाचशे रुपये, दहा ग्रॅमची एक व पाच ग्रॅम सोन्याचे दोन चेन असा एकूण पासष्ट हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचे आबेदखाँ पठाण यांनी सांगितले.
ऐवज लुटून पळताना त्यांच्या चपला त्यांनी तेथेच सोडल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर चोरट्यांनी पठाण यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या आव्हाना रोडवरील ट्रकचालक सलीमखाँ नूरखाँ पठाण यांचे बंद घर फोडून वीस हजार रुपये नगदी व दहा हजारांचा ऐवज चोरल्याचे त्यांनी सांगितले. सलीमखाँ यांनी शहर पोलिसांकडे तक्रारीसाठी शुक्रवारी 20 तारखेला चकरा मारल्या, परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटळ केल्याने तक्रार न देताच ते निघून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.