आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोरांच्या टोळीला दिली पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठण-आैरंगाबादरस्त्यावरील बेस्ट प्राईस मॉलसमोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सातारा पोलिसांनी गजाआड केले. त्या टोळीला आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले असता १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सातारा ठाण्याचे पथक पैठण रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना बेस्ट प्राईस मॉलसमोर रस्त्यावर संशयितरित्या ओमनी कार दुचाकी उभी असल्याची दिसली. पथकाने त्या कारकडे धाव घेतली असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून हतेहा शैनु इरणी , बरकत अली अनु अली रा. श्रीरामपूर, संतोष पवार, संदीप खंडागळे रा. निपानी आडगाव या चाैघांना अटक केली. त्याच्या ताब्यातून दोरी, काळे कपडे, मिर्ची पावडर, मोबाईल, कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली. अंधाराचा फायदा घेऊन एक दरोडेखोर पसार झाला. या दरोडेखोरांविरुध्द सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. कुलकर्णी यांच्या समोर हजर करण्यात आले. फरार दरोडेखोरांचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली.