आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा लाखांची घरफोडी; साडेदहा तोळ्यांचे दागिने लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पडेगावजवळील प्रियदर्शिनी कॉलनीत व्यापार्‍याच्या बंद बंगल्यात घुसून चोरट्यांनी कपाटातील 1 लाख 40 हजार रुपये आणि सोन्याचे साडेदहा तोळ्यांचे दागिने लंपास केले. रविवारी दुपारी दीड ते रात्री साडेआठदरम्यान ही घटना घडली.

ऑइलचा व्यवसाय करणारे मुश्ताक अली मीर मोहंमद हे सहकुटुंब कार्यक्रमानिमित्त शहागंज येथे नातेवाइकांकडे गेले होते. बंगल्याला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडला व आत घुसले. त्यानंतर कपाटात ठेवलेले रोख 1 लाख 40 हजार रुपये आणि एक नेकलेस, सोन्याच्या अंगठय़ा असे साडेदहा तोळ्यांचे दागिने आणि दहा ग्रॅम चांदीचे शिक्के, राडो कंपनीची एक घड्याळ, नोकिया कंपनीचा मोबाइल असा ऐवज लंपास करण्यात आला. रात्री साडेआठ वाजता मुश्ताक अली घरी परतले तेव्हा चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांनी तातडीने छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.