आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत चोरांचा सुळसुळाट; साडेपाच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडकोच्या नूतन बहुउद्देशीय शाळेसमोरून अँक्टिव्हा दुचाकीवर जाणार्‍या शिक्षिकेचे साडेपाच तोळ्याचे मंगळसूत्र काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या दोघांनी हिसकावत पळ काढला. ही घटना सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.

हडको, एन-12 येथील रहिवासी कुंदा मधुकर नीळ (39) या दुपारी साडेबाराच्या सुमारास नूतन बहुउद्देशीय शाळेसमोरून दुचाकीवर जात होत्या. या वेळी समोरून दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख 37 हजार रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावत धूम ठोकली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल टकले करीत आहेत.