आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशीदपुर्‍यात व्यापार्‍याचे घर फोडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लग्न समारंभासाठी गेलेल्या रशीदपुर्‍यातील व्यापार्‍याचे भरदिवसा घर फोडून चोरांनी 50 हजारांची रोकड आणि 12 ग्रॅमचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास उघडकीस आली.

श्वानाने पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागील विक्रम स्टेडियमपर्यंत चोराचा माग काढला. मात्र, चोर दुचाकीवर पसार झाल्याने त्यांचा शोध लागू शकला नाही. व्यापारी अन्वर खान अहमद समद खान सकाळी 10 वाजता घराला कुलूप लावून सहकुटुंब लग्न समारंभासाठी गेले होते. चोरट्याने दुपारी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ उभ्या असलेल्या रिक्षाच्या टपावरून वाड्यात उडी घेतली. याच्यानंतर दोन दरवाजे तोडत ते घरात घुसले. घरातील कपाटात असलेली 50 हजार रुपयांची रोकड आणि 12 ग्रॅमचे दागिने असा ऐवज या वेळी लंपास करण्यात आला. सायंकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तत्काळ सिटी चौक पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर श्वान नैनासह उपनिरीक्षक भाऊसाहेब बनसोडे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोराचा माग काढला. सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.