आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: चोरट्यांनी फोडले कापड दुकान; चोरले काय? तर मापाचे कपडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरट्यांनी अस्ताव्यस्त टाकलेले कपडे. चोरटे ज्या खिडकीतून आत आले त्या खिडकीची पाहणी करताना पोलिस कॉन्स्टेबल राज सूर्यवंशी. - Divya Marathi
चोरट्यांनी अस्ताव्यस्त टाकलेले कपडे. चोरटे ज्या खिडकीतून आत आले त्या खिडकीची पाहणी करताना पोलिस कॉन्स्टेबल राज सूर्यवंशी.
वाळूज- पंढरपूर येथील भगवानजी कलेक्शन कापड दुकानामध्ये दुसऱ्या मजल्यावरील खिडकीची जाळी तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश करत आतील रोख ३० हजार एक लाख ५० हजार रूपयांच्या कपड्यांवर हात साफ कल्याची फिर्याद दुकान मालक संजय चौहाण यांनी दिली आहे.
 
ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या सर्व हालचाली दुकानामध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे चोरट्यांना लवकरच पकडण्यात यश येईल असा विश्वास पोलिसांनी वर्तवला आहे. चार दिवसांपूर्वी पंढरपूर येथील सुशील प्रोव्हिजन कोठारी प्रोव्हिजनमध्येही चोरट्यांनी चोरी केली. मात्र, या प्रकरणाची पोलिसांत नोंद केली नसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणेअंतर्गत असणाऱ्या पंढरपूर येथील मुख्य बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी भरवस्तीत असणाऱ्या भगवान कलेक्शनमध्ये चोरट्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश खिडकीची जाळी तोडून आत प्रवेश केला. तब्बल चार तास आतमध्ये असणाऱ्या चोरट्याने आतील कपडे, गल्ल्यातील २५ हजार रुपये गोमातासाठी ठेवलेल्या हजार ५०० रुपयांवर हात साफ केल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता कामावर आलेल्या श्रीपाल धोंडलकर या कामगाराच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती दुकान मालकाला दिली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी धाव घेऊन दुकानाची पाहणी केली. चोरट्यांनी जातेवेळी अंगातील जॅकेट दुकानातच सोडून पळ काढल्यामुळे जुनाट जॅकेटशिवाय पोलिसांना काहीएक आढळून आले नाही. 

कापड दुकानात प्रवेश 
- चोरट्यांनीआतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कपडा टाकून ते झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या. 
- चोरट्यांनी स्वत:च्या मापाचे कपडे, त्यात जीन्स, शर्ट जॅकेट पारखून पिशवीत भरले. एका चोरट्याने ३८ ते ४० मापाच्या जीन्स पॅँट अन् त्यात पांढऱ्या रंगाच्या अधिक तर काही निळसर, आकाशी रंगाच्या जीन्स घेतल्या. दुसऱ्याने ते १० वर्षीय मुलीचा घागरा-चोळी ड्रेसची पाकिटे घेतली अन् दुकानात फिरून मापांचे कपडे घेण्यावर भर दिल्याची गोष्ट सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येते. त्यावरून चोरटे सराईत गुन्हेगार नसून परिसरातीलच रहिवासी असावेत असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...