आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकट्या झोपलेल्या माजी पीअायचा बंगला फोडला, बनावट चाव्यांनी 6 लाखांचा ऐवज लांबवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको एन-७, बजरंग चौक परिसरात असलेल्या जय लक्ष्मी कॉलनीतील रहिवाशाचे सोमवारी मध्यरात्री घर फोडल्यानंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत एन-३ भागातील सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकांचे घर फोडल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. एकाच पद्धतीने जय लक्ष्मी कॉलनी आणि एन- भागातील घर फोडल्याचे समोर आले आहे.
 
सिडको एन- भागातील सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक अशोक गोविंदराव कटके (६७, रा. प्लॉट क्र. २४०) हे मुलासोबत बंगल्यात राहतात. त्यांचा मुलगा अभिनंदन कटके हा राखी पौर्णिमेसाठी पुण्याला गेलेला असल्याने अशोक कटके तळमजल्यावरील घरात एकटेच होते, त्यांच्या दुमजली बंगल्यातील वरच्या खोल्या त्यांनी भाड्याने दिलेल्या आहेत.
 
रात्री एक वाजता कटके झोपल्यानंतर दुचाकीवर आलेल्या चोराने कंपाउंडवरून उडी मारून घरात प्रवेश केला. कटके बैठक खोलीत झोपलेले होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चोराने बाहेरून कडी लावली. यानंतर बेडरूमच्या खिडकीचे ग्रील काढून, ते खिडकीखाली ठेवून चोराने घरात शिरकाव केला. बेडरूममध्ये शिरताच त्याने कोणालाही आवाज जाऊ नये यासाठी कटके असलेल्या बेडरूमशेजारच्या खोलीचा (बैठक खोलीतून बेडरूमकडे येणारा दरवाजा) दरवाजा बंद करून त्यालाही कडी लावून घेतली. 

दाराखाली चादर लावली. लोखंडी कपाट बनावट किल्लीच्या साहाय्याने उघडले. याच कपाटात दागदागिने, रोकड असलेल्या ड्रॉवरच्या किल्ल्या सापडल्या. ड्रॉवर उघडून चोराने कपाटातील सहा तोळ्यांच्या चार बांगड्या, पाच तोळ्यांचा गोफ, सतरा ग्रॅमचा नेकलेस, तीन ग्रॅमची अमेरिकन हिऱ्यांची अंगठी, एक तोळ्याच्या रत्नांच्या चार अंगठ्या, साडेआठ ग्रॅमच्या दोन रिंग आणि तीस हजारांची रोख (पाचशेच्या नोटा) असा सहा लाख तीस हजारांचा ऐवज चोरून नेला. सकाळी पावणेसहाच्या सुमारास कटके झोपेतून उघडल्यानंतर त्यांनी स्वयंपाक खोली, बेडरूमकडे जाणारा तसेच मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही दारे बंद असल्याचे कळल्यानंतर त्यांनी वरच्या मजल्यावर रहाणाऱ्या मुंडेंना फोन केला.
 
मुंडेंनी मुख्य प्रवेशद्वाराची कडी उघडल्यानंतर ते बाहेर आले. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरा पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. 

कंपाउंडमध्ये शौच करून गेला चोर 
बंगल्यातून बाहेर येण्यापूर्वी कंपाउंडच्या भिंतीलगतच्या झाडांजवळ चोराने शौच केली. तसेच पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी प्लास्टिकच्या बांगड्या काळ्या मण्यांची माळ मागील भागात फेकली. या बंगल्याला खेटून असलेल्या विजेच्या खांबावरून खाली उतरून दुचाकीने हा चोरटा पसार झाला. 
बातम्या आणखी आहेत...