आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब चोरीची गजब गोष्ट: चोरट्यांनी बँक फोडली, पण चोरी झाली की नाही हे गुलदस्त्यातच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औराळा- कन्नड तालुक्यातील जेहूर येथील पंजाब नॅशनल बँक चाेरट्यांनी फाेडली खरी, पण झालेल्या चाेरीच्या तपासासाठी आलेले अधिकारी बँक कर्मचाऱ्यांकडून सुध्दा रात्री उशिरापर्यंत उघडली नाही. मग चाेरट्यांनी ती कशी उघडली की उघडण्याच्या नादात चाेरट्यांकडून तिजोरी लाॅक झाली की पैसे काढून ती तिजाेरी लाॅक केली हेच तपास अधिकाऱ्यांना हाती लागले नसल्याने नेमकी किती रक्कम चाेरट्यांनी पळवली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. बँक इमारतीची पाठीमागच्या विनाप्लास्टरची भिंत फाेडण्यासाठी चाेरट्यांनी टिकाव, छन्नी, हाताेडी, तीन किलाेचे दाेन सिलिंडर या साहित्याचा वापर करून चाेरटे रिकाम्या हाताने खरच पसार कसे हाेतील, असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना देखील पडला आहे. या वेळी एलसीपीचे कापुरे, पठाण, राख, नदीम माेरे, मदने, श्वानपथकाचे प्रमुख घुगे, देवगाव रंगारी पाेलिस ठाण्याच्या पाेलिस निरीक्षक राजश्री आडे आदींनी दिवसभर तपास केला. 

हार्डडिस्क पळवली
चाेरट्यांनीबँक फाेडण्याअगाेदर बँकेचे लाइट कनेक्शनचे सीसीटीव्हीचे वायर कट केल्याचे स्पष्ट दिसते. सीसीटीव्हीसाठी वापरण्यात आलेल्या पीसी फाेडून त्यामधील हार्डडिस्क चोरट्यांनी पळवली. नियाेजनबध्द कट असताना चाेरटे रिकाम्या हाताने कसे जातील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

मॅनेजरची उडवाउडवीची उत्तरे
शनिवारी बँकेचा व्यवहार बंद केल्यानंतर किती रक्कम शिल्लक हाेती याबाबतची माहिती बँक मॅनेजर राहुल जाधव यांना विचारले असता आम्ही ही माहिती फक्त आमच्या बँकेच्या वरिष्ठांना देऊ, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

शोध मोहीम चार नंतर बंद 
रविवारी रात्री बँक फोडली, परंतू किती रक्कम चोरी गेली हे कळाले नाही. वीज गुल असल्याने डाटा उघडला नाही अन रक्कम चोरी झाली की नाही हे कळाले नाही, दिवसभर पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र काही झाले नाही. सायंकाळी चार नंतर आता उद्या बघू असे म्हणत पोलिस रिकाम्या हाताने परतले. 

वीज नसल्याने रक्कम कळेना 
तपास अधिकारी सपोनि जयश्री आढे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, बँकेच्या तिजोरीत किती रक्कम होती किती चोरी झाली ही माहिती तिजोरी उघडल्याने मिळू शकली नाही. तसेच व्यवस्थापकांनी सांगितले, वीज नसल्याने बँकेत शनिवारी किती रोकड होती याची माहिती नेमकी सांगता येत नाही. 
बातम्या आणखी आहेत...