आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात चोरी; प्रवाशाचे 3 लाख लांबवले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विमानात चोरी झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. स्पाइस जेटच्या मुंबई-नांदेड विमानप्रवासात प्रवाशाचे 2 लाख 90 हजार रुपये चोरीस गेल्याची घटना शनिवारी दुपारी 1 वाजता घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पुसदचे (जि. यवतमाळ) मूळ रहिवासी असलेले बिल्डर श्रीनिवास रघुनाथ केळकर 20 वर्षांपासून पनवेलला राहतात. पुसदला आई-वडिलांना भेटण्यासाठी शनिवारी दुपारी 12 वाजता ते मुंबईहून स्पाइस जेटच्या विमानात (2441 सीट नंबर 19 बी)बसले. केळकर यांनी जवळच्या कॅरिबॅगमधील टी शर्टमध्ये 2 लाख 90 हजार 900 रुपये गुंडाळून ठेवले होते. त्यांनी फ्रंट सीटच्या मागील पॉकेटमध्ये कॅरिबॅग ठेवली. नांदेडात उतरल्यानंतर कॅरिबॅग विमानातच राहिल्याचे केळकर यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी सिक्युरिटीला सांगितली. मात्र, विमानात कॅरिबॅग नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. या ऐंशी आसनी विमानात 75 प्रवासी होते. शिवाय दोन पायलट, हवाईसुंदरी, फ्लाइट स्टीव्ह पुरुष असा स्टाफ होता. विमानात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते.

दहा मिनिटांत पैसे गायब
पैसे विमानातच विसरल्याचे नांदेड येथे लक्षात आले. पुन्हा विमानात जाता येत नाही म्हणून मी कॉन्स्टेबलला सांगितले. त्यांनी वॉकीटॉकीवरून विमानात संदेश दिला. मात्र, येथे काहीच नसल्याचे सांगण्यात आले. 10 मिनिटांत पैसे गायब होतातच कसे? विमानात एक एअर होस्टेस व एक फ्लाइट स्टीव्ह होते. मी मागील दुसर्‍या रांगेतल्या सीटवर होतो. या घटनेची त्याच वेळी विमानतळावर नोंद केली. रविवारी एफआयआर नोंदवला. - श्रीनिवास केळकर, प्रवासी, पनवेल, मुंबई