औरंगाबाद - विद्यापीठाचे मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. प्रल्हाद गोविंद लुलेकर यांचे घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचे दागिने आणि २५ हजारांची रोकड लंपास केली. मुलाच्या लग्नासाठी त्यांनी दािगने खरेदी केले होते. प्रा. लुलेकर यांची पत्नी गावी गेल्या आहेत तर लुलेकर हे सकाळी ११ च्या सुमारास विद्यापीठात गेले. संध्याकाळी पाचला ते घरी परतले तेव्हा घरफोडीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. चोरट्यांनी कंपाउंडच्या गेटवरून व्हरांड्यात प्रवेश केला व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
लुलेकरांच्या घरासमोरील बंगल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात अाला आहे. मात्र या कॅमेऱ्याची दिशा लुलेकर यांच्या घराकडे नाही. तरीदेखील या कॅमेऱ्यात काही सापडते का याचा तपास सुरू आहे.