आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावीर चौकातील किराणा दुकान फोडून पावणेदोन लाख पळवले, 15 दिवसांतील दुसरी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या पंढरपूर येथील एस. आर. पगारिया ट्रेडर्स या होलसेल किराणा दुकानाचेे शटर उचकटून दोघा चोरट्यांनी अंदाजे रोख लाख ८० हजार रुपये इतर ऐवज पळवल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

विशेष म्हणजे चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. ऑगस्ट रोजी दोन, तर १५ ऑगस्ट रोजी एक अशा १२ दिवसांमध्ये दोन चोरीच्या घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. 

महावीर चौकात योगेश फुलचंद पगारिया (४३, रा. पंढरपूर, महावीर चौक) यांच्या मालकीचे एस. आर. पगारिया ट्रेडर्स हे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. १५ ऑगस्ट रोजी दोघा चोरट्यांनी टॉमीच्या साहाय्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गल्ल्यातील कपाटातील असे एकूण अंदाजे रोख लाख ७० ते ८० हजार रुपये लांबवले. शिवाय काजू-बदामाची पाकिटेही पळवली. हा प्रकार सकाळी सव्वासातच्या सुमारास उघडकीस आला. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन दुकानाचा पंचनामा केला आणि गुन्हा दाखल केला. 

श्वानपथकही आले नाही 
एवढी मोठी चोरी होऊनही श्वानपथकाकडून ठसेतज्ज्ञांकडून या घटनेची पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी ही दोन्ही पथके आता नावापुरतेच उरलीत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

३५ मिनिटांत हात साफ
या दुकानाच्या आत तीन, तर बाहेर एक असे एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. १५ ऑगस्ट रोजी पहाटे साधारणत: १.३०च्या सुमारास पावसात दोघा चोरट्यांनी सर्वप्रथम परिस्थितीचा अंदाज घेतला. सर्व लोक झोपल्याची खात्री केली. त्यानंतर दुकानासमोरील बल्ब फोडून अंधार केला. त्यानंतर टॉमीच्या साह्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. अवघ्या ३५ मिनिटांत चोरी करून पोबारा केला. 
बातम्या आणखी आहेत...