आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज महानगरात चोरट्यांचा धुमाकूळ, तरुणीचे डोके फोडले, नागरिकांत दहशत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक ते अडीच वाजेच्या दरम्यान वाळूज महानगरातील सिडकोच्या नगर एकमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यात प्रतिकार करताना चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणीचे डोके फुटले आहे. चोरट्यांचा एका ठिकाणी कुलूप तोडून केलेला प्रयत्न फसला. मात्र, दोन ठिकाणाहून चोरट्यांनी सोन्याच्या ऐवजासह दोन मोबाइल लंपास केले. 

चोरीचा पहिला प्रकार 
सिडकोवसाहतीत महावीरनगर आहे. या ठिकाणी भालेराव यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर नदीम साहेबलाल शेख हे त्यांच्या भाऊ भावजयीसह भाड्याने राहतात. घटनेच्या दिवशी ते झोपलेले असताना चोरटे त्यांच्या घराच्या दाराची कडी लोखंडी टॉमीने उचकटून आत शिरले. घरामध्ये दोन कुलर फॅन सुरू असल्याने त्यांना चोरट्यांच्या हालचालींचा आवाज आला नाही. चोरट्यांनी सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाइल घेऊन पळ काढला. शेख यांच्या वहिनी रुख्साणा शेख या पहाटे पाच वाजता मुलांना शाळेत जाण्यासाठीची तयारी करत असताना चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. 

चोरीचा दुसरा प्रयत्न 
शेखराहत असलेल्या घरापासून पश्चिमेस हाकेच्या अंतरावर सुरेश साळुंके परिवारासह राहतात. चोरटे मध्यरात्रीनंतर सव्वाएकच्या सुमारास त्यांच्या गेटवरील कुलूप तोडून ते घराच्या दारापर्यंत आले. त्यानंतर त्यांनी घराच्या मुख्य दाराला लोखंडी टॉमी लावून उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, साळुंके यांना आवाज आल्याने ते दाराजवळ थांबून त्यांनी आवाज देऊन पत्नीला उठवले. लगतच्या रहिवाशांना फोन लावण्यास सांगितल्याने चोरट्यांनी आवाज ऐकून पळ काढला. तेव्हा साळुंके यांनी त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलागही केला; परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. 

चोरीचा तिसरा प्रयत्न 
महावीरनगरातीलपहिल्याच चाळीत राहत असलेल्या घरामध्ये सीमा पाटील या मुलगी माधुरी मुलगा भावेश अशा दोघांसह तळमजल्यावर राहतात. घटनेच्या दिवशी साळुंके यांनी केलेल्या पाठलागानंतर तिघे चोरटे सीमा पाटील यांच्या वॉलकंपाउंडच्या गेटचे कुलूप कापून आत आले. अन्य चौघे जण बाहेर थांबले. आत आलेल्यांनी घराचे दार लोखंडी टाॅमीने उघडले. तेव्हा सीमा, माधुरी भावेश अशा तिघांनीही आरडाओरड केली. सीमा या भाडेकरूंना फोन लावत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या हातातून मोबाइल हिसकावला, तर दुसऱ्याने माधुरीच्या डोक्यात हातातील दगड मारून तिला जखमी केले. अशा पद्धतीने दहशत पसरवून चोरट्यांनी काही साड्या कपड्यांची बॅग, मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे असलेली हँडबॅग ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील पदक असा हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी जखमी माधुरी पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 
बातम्या आणखी आहेत...